ब्रेकिंग

क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या

 

दोन आरोपी जेरबंद, शिरपुर पोलिसांची कारवाई

यवतमाळ : क्षुल्लक कारणावरुन एका युवकाच्या डोक्यावर रॉडने मारहाण करुन त्याची हत्य केल्याची घटना रविवारी रात्री आवयी फाटा येथे घडली. शिरपुर पोलिसांनी काही तासातच मुख्य सुत्रधारासह एका आरोपीला जेरबंद केले.
आकाश हरीदास गोवारदीपे (२३) रा. वेळाबाई असे मृतकाचे नाव आहे. गोलु उर्फ प्रतीक चंद्रभान वडस्कर (२८), सोमेश्वर गजानन कावळे (१९)रा. वेळाबाई अशी अटक केलेल्यशा आरोपीची नावे आहे. अभय फाटा येथील वेलडण बार समोर आरोपींनी क्षुल्लक कारणावरुन आकाशच्या डोक्यावर रॉडने मारहाण केली. यामध्ये आकाशचा मृत्यू झाला. या बाबतची माहिती शिरपुरचे ठाणेदार गजानन, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे व कर्मचा-यांनी घटनास्ळ गाठले. संशयीत आरोपी गोलु उर्फ प्रतीक चंद्रभान वडस्कर यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सुरवातीस उडवा उडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे वेलडण बारचे सिसिटीव्ही फुटेज तपासले असता गोलु उर्फ प्रतीक चंद्रभान वडस्कर ,सोमेश्वर गजानन कावळे वय १९ वर्ष रा. वेळाबाई तसेच इतर दोन आरोपी निष्पन्न झाले. गुन्हयातील मयताची आई माया हरिदास गोवारदिपे वय ४८ वर्ष रा. वेळाबाई यांचे जबानी रिपोर्ट वरुन शिरपुर पोलीस स्टेशन अपराध नंबर २६९/२०२१ भादवि कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन करेवाड, ठाणेदार शिरपुर पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, अनिल सुरपाम, गंगाधर घोडाम, सुगद दिवेकर, प्रमोद जुनुनकर, गजानन सावसाकळे, अभीजीत कोष्टवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!