ब्रेकिंग

दत्तमांजरी घाटात अपघात; 13 भाविक जखमी

  1. माहूर : तालुक्यातील शेख फरीद वझरा येथील दर्ग्यावर जात असलेल्या भाविकाच्या ऑटो ला दत्तशिखर – दत्तमांजरी घाटात झालेल्या अपघातात 13 भाविक जखमी झाले असून सात भाविकांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी यवतमाळ ला हलविण्यात आले आहे.

माहूर तालुक्यातील शे.फ.वझरा येथे नवस फेडण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील भाविक जात होते,दत्त शिखर – दत्त मांजरी घाटात कठीण वळणावर ऑटो क्रमांक एम.एच.04 एफ जे 0551 च्या चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात मुजिद खान (45) शेख मुजरेद्दिन (70) राहील शेख रज्याक (20) सय्यद फसिक (26), फयाद शेख (12) सय्यद इफाक ( 28) सादिक शब्बीर शेख (28) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना यवतमाळ येथे उपचारा साठी हलविण्यात आले. तर सय्यद फारुख शेख (26),शेख साबीर शेख मस्तान (45),रूखसूना बेगम सुभेदार खान (40) शेख अहेमद शेख हनीफ (52),शेख खाजा शेख अजीज (35), साजीद मलनस हरून (39),अयान पठाण अमन (11) हे किरकोळ जखमी झाले आहे.सर्वच जखमी वर माहूर ग्रामीण रुग्णालयात डॉ.उदय काण्णव,व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार केले.दत्तशिखर दत्तमांजरी घाटात यापूर्वी अनेक वेळा अपघात झाले असून कठीण वळणावर सूचना फलक लावणे व अत्यंत खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!