व्हिडिओ व्हायरल करुन पालिका कर्मचा-याची आत्महत्या, शिवसेना महिला पदाधिकावर गुन्हा

दिग्रस (यवतमाळ)
येथील नगर पालिका कर्मचा-याने सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल करुन आत्महत्या केल्याची घटना 8 सप्टेंबर रोजी दिग्रस येथे घडली. शिवसेनेच्या महिला पदाधिका-याने पाच लाख खंडणी मागुन त्रास दिला. या त्रासाला कंटाळून पालिका कर्मचा-याने आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अनिल अशोक उबाळे (३५)रा. आंबेडकर नगर दिग्रस असे मृतकाचे नाव आहे. दिग्रस नगर परिषद मध्ये तो सफाई कर्मचारी होता. तसेच काल बुधवार दि.८ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान विष प्राशन करून आत्महत्या केली होती. मृत्यू पूर्वी अनिल उबाळे याने एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्यामध्ये त्याने अर्चना अरविंद राठोड (३२) हिचा सात वर्षांपासून त्रास आहे. सदर महिला शिवसेना उपाध्यक्ष असून ती वारंवार पैशाची मागणी करीत होती.५ लाख खंडणी मागितली होती. त्यामधून कर्ज काढून २ लाख दिले होते. सततच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमुद केले आहे.
पोलीस स्टेशन समोर ठिय्या
याबाबत समाज बांधवांनी दिग्रस पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडून आरोपीवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती. दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांनी फिर्यादी रमा अनिल उबाळे यांच्या तक्रारीवरून आरोपी अर्चना अरविंद राठोड (३२) रा.साईनगर दिग्रस यांच्यावर गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध सुरू आहे.