हाय प्रोफाईल जुगारावर धाड, १३ जणांना अटक, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ : येथील जाजु चौकातील राजन्ना अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या हायप्रोफाईल जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. यामध्ये 13 जणांना अटक केली असून 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
निलेश महेंद्र पिपरानी (४३) रा.राजन्ना अपार्टमेंट, मनिष रामविलास मालानी (४४) रा.बोरी अरब, सौरव शिवम मोर (४१) रा.मेन लाईन यवतमाळ ,विपुल पद्माकर खोब्रागडे रा.पाटीपुरा, राहुल सुरेंद्र शुक्ला (४०) माईन्दे चौक यवतमाळ, नवल नारायण बजाज उर्फ अग्रवाल (५५) रा. चांदोरे नगर, प्रेमरतन ताराचंद राठी ( ४४) रा.गांधी नगर यवतमाळ, रूपेश आनंदराव कडु (४२) रा.धामनगाव रोड, सुनील हरीरामजी अग्रवाल (५३) रा.गुरूदेव नगर, लक्ष्मिकांत चंम्पालालजी गांधी (५८) रा.राजन्ना अपार्टमेंट, अनिल भवरीलालजी मानधना (५४) रा.श्रोत्री हॉस्पीटल जवळ, कमलेश अमृतलाल गंधेचा (४८) रा.माईन्दे चौक,अशोक ओंकारमल भंडारी (६०) रा.सारस्वत चौक अशी जुगार खेळणा-यांची नावे आहे. अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या जाजु अपार्टमेंट येथील निलेश पिपरानी याच्या चौथ्या मजल्यावर प्लॅट क्रमांक ४०१ मध्ये जुगार सुरू असल्याची माहीती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. त्यावरून गुन्हे शाखेने रात्री जाजु चौकातील राजन्ना अपार्टमेंट मध्ये धाड टाकली.१३ आरोपी कडुन जुगारात सुरू असलेल्या डावामधुन ५ लाख ५७ हजार रूपये रोख १६ मोबाईल किंमत १लाख ९४ हजार रूपये दुचाकी वाहने ४ लाख रूपये असा एकुन ११ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.