ब्रेकिंग

बेंबळा प्रकल्पाचे १८दरवाजे उघडले

 

यवतमाळ : जिल्हयात पावसाने कहर केला असून, नदी, नाले तुडुंब वाहत आहे. धरणासह प्रकल्पाच्या पाण्याची पातळी वाढली आहे. बाभुळगाव येथील बेंबळा प्रकल्प १०० टक्के भरले आहे. धरणाचे १८ दरवाजे ५० से.मी.ने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या कॅचमेंट भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्प शंभर टक्के भरला असून पाण्याची पातळी २६८ मिटर इतकी झाली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करणे आवष्यक झाले होते. त्यानुसार पाणी बेबळा नदि पात्रात सोडण्यात आले. नदि काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव देवी गावाला जोडणारा पुल पुर्णपणे खरडून गेला. त्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. तर तालुक्यात अनेक ठिकाणी नदि, नाल्या काठावरील शेतजमीनींमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर. यावली, राणी अमरावती येथील नाल्यांवर मासे पकडण्यासाठी दोघे भाऊ गेले असता पुराच्या पाण्यात संतोष श्रीराम पारीसे (३५) रा. राणी अमरावती हा युवक बुडाला. त्याला बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात नेतेवेळी त्याचा मृत्यू झाला.करळगाव घाट व त्या लगतच्या परिसरात काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. त्यामुळे बाभुळगाव शहरा नजिक असलेल्या नदिला पुर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे काही काळ वाहतुक बंद होती. तर बकरी बाजार परिसरातील घरापर्यंत नदिच्या पात्राचे पाणी पोहचले होते. मात्र कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. बेंबळा प्रकल्पाच्या कँचमेंट एरीया मध्ये मुसळधार पाऊस सूरू असून प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सद्यस्थितीतील धरणाचे उर्ध्व भागातील पूरस्थिती लक्षात घेता सायंकाळी ६ वाजता प्रकल्पाचे एकूण १८ दरवाजे ५० सेमी नी ऊघडण्यात येत आहे. प्रकल्पातून ९५४ घमी प्रसेकंद विसर्ग सुरू राहील. नदीकाठच्या गावातील लोकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले.

इसापूर धरण ९० टक्के भरले
पुसद तालुक्यातील इसापूर धरण ९०.१० % भरले आहे . धरण पाणी पातळी ४३९.९८ मी आहे. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशय पाणी पातळीत वाढ होत आहे. मा. मुख्य अभियंता (ज.सं), जलसंपदा विभाग औरंगाबाद यांचे संदर्भीय पत्रान्वये इसापूर धरणावा जलाशय प्रचालन आराखडा मंजुर आहे. पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाचा मंजूर जलाशय प्रचलन आराखडा नुसार दि. १५ सप्टेंबर पर्यंत ४४०.८५ मी. ठेवावी लागणार आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने इसापूर धरणातून वक्रदाराद्वारे कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरिक्त पाणी पेनगंगा नदीपात्रात सोडावे लागण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!