ब्रेकिंग

पाण्यातुन दुचाकी काढणे भोवले; दोन युवक गेले वाहुन

 

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून धुव्वाधार पाउस सुरू असून, नदी व नाल्यांना पुर आला आहे. अशातच काळी दौ ते दिग्रस मार्गवर वसंत नगर येथील पुलावरून दुचाकी काढताना दोन युवक पुरात वाहुन गेले. ६ सप्टेंबरच्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास हि घटना घडली.
ज्ञानेश्वर जाधव (२८), सुरेश महिंद्रे (२७) रा. साई ईजारा ता. महागाव असे वाहुन गेलेल्या युवकाचे नाव आहे. सोमवार पासुन जिल्ह्यात धुव्वाधार पाउस सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यांना पुर आला आहे. दरम्यान साई इजारा येथील दोन युवक वसंत नगर वरील पुलावरून दुचाकी क्रमांक एम. एच. २९ ए. व्ही. ००७४ ने जात होते. पुलावरील पाण्यातुन ते दुचाकी काढण्याचा प्रयत्न करीत होते. अशातच ते दोन्ही युवक पुरात वाहुन गेले. या बाबतची माहिती मिळताच दिग्रसचे पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांनी सहाय्यक उपनिरीक्षक गुणवंत गोटे व पोलीस कर्मचा-यांना घटनास्थळी रवाना केले.
चौकट
सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
पुलावरुन वाहना-या पाण्यातून दोन युवक वाहुन गेले. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. दुचाकी काढण्याच्या नादात हे दोन्ही युवक पाण्यात वाहून गेल्याचे समोर आले आहे. या दोन्ही युवकांचे शोधकार्य सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!