विदर्भ

खोडसाळपणाने वीज पुरवठा खंडित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

 

यवतमाळ: जिल्ह्यातील महागाव  येथून जवळच असलेल्या महामार्गावरील कलगाव टी पॉईंटनजीक कट पॉईंट, डबल पोलवर वीज तार टाकून अज्ञात व्यक्तीकडून हेतूपुरस्पर वीज पुरवठा खंडित करीत होता. खोडसाळपणा करून महावितरणला बदनाम करण्याचा प्रयत्न उघडकीस आल्याने महावितरणने महागाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात व्यक्तिविरूध्द विद्युत कायदा २००३ कलम १३९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महागाव तालुक्यात मागील काही दिवसापासून तालुक्यात काही भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे जनता त्रस्त होती. शिवाय महावितरणकडून सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही हा प्रकार सुरू असल्याने महावितरणला ग्राहकाचा रोषाला सामोरे जावे लागत होते. शनिवार रात्री ३३ केव्ही महागाव- गुंज वीज वाहिनी तसेच ११ केव्ही अंबोडा वाहिनी वारंवार बंद पडत होती.तसेच रात्री असलेला पाऊस बघता सकाळीच या वाहिनीची पाहणी केली. महागाव -कलगाव फाट्याजवळ असलेल्या एबी स्विच जवळ कोणीतर अज्ञात व्यक्तिकडून डबल पोलवर वीज वाहक तारेचा तुकडा टाकून ही वीज वाहिनी हेतूपुरस्पर बंद पाडल्याचे दिसून आले. याशिवाय या वाहिनीवर टाकलेली वीज तार ही १० फुट होती. तसेच ती लोखंडी पोलला चिपकलेली होती, अनावधानाने त्या पोलमध्ये करंट उतरून कोणतीच जीवीत हानी झाली नाही. महावितरणला जाणिवपूर्वक बदनाम करण्यासोबत विजेसारख्या अत्यावशक सेवेत खोडसाळपणा करून तालुक्यातील जनतेला वेठीस धरल्याप्रकरणी महागाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!