विदर्भ

बसपाच्या जिल्हा संगठन मंत्री तथा जिल्हा प्रवक्तापदी सुनील पुनवटकर

 

बसपाच्या जिल्हा संघटनमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल

यवतमाळ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन बहुजन समाज पार्टी च्या जिल्हा संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले. यामध्ये अत्यंत महत्वाच्या संगठन महामंत्री पदासह जिल्हा प्रवक्ता पदावर जेस्ठ कार्यकर्ते सुनील पुनवटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
प्रदेश सचिव तथा यवतमाळ जिल्हा प्रभारी राजेंद्र कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ५ सप्टेंबर रोजी स्थानिक विश्राम भवन येथे बैठक पार पडली. जिल्ह्यात आगामी काळात होणा-या सर्व नगर पंचायत तथा नगर पालिकेच्या निवडणुका पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभेचे प्रभारी निश्चित करण्यात आले . जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना विशेष जबाबदारी सोपवण्यात आली. यवतमाळ आणि आर्णि विधानसभेचा प्रभार जिल्हाध्यक्ष गुणवंत गणवीर आणि जिल्हा प्रवक्ता तथा संघटनमंत्री सुनीलजी पुनवटकर यांच्याकडे देण्यात आला. जिल्हा प्रभारी विजयराव वानखेडे आणि जिल्हा कोषाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याकडे वणी आणि राळेगाव विधानसभेचा प्रभार सोपविण्यात आला. जिल्हा महासचिव डॉक्टर गोवर्धन जी वानखडे आणि धनराजजी धावणे यांच्याकडे दिग्रस विधानसभेचा प्रभार सोपविण्यात आला. प्रदेश सचिव आयु. राजेंद्रजी कांबळे आणि जिल्हा प्रभारी दिलीप बेलसरे यांचेकडे पुसद आणि उमरखेड या विधानसभेचा प्रभार सोपविण्यात आला. जिल्हा बामसेफ संयोजक म्हणून एडवोकेट प्रशांत इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीकरिता प्रत्येक वार्डात कोअर कमिटी तयार करून त्यांच्याकडून आलेल्या नावां मधून उमेदवाराची निवड करण्यात यावी असे ठरले. सुरुवात म्हणून पाटीपुरा यवतमाळ परिसरातील एकूण चार वार्डा करीता १२ सन्मानित कार्यकर्त्यांची कोअर कमिटी नेमण्यात आली. या कोअर कमेटी कडून तथा यवतमाळ नगर पालिका क्षेत्रातील निवडणूक लढवू इछिणार्या उमेदवारांकडून येत्या २० सेप्टेंबर पर्यन्त पक्षाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . संभावित उमेदवारांना आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पक्ष सर्व पातळीवर प्रशिक्षित करणार असल्याचे जिल्हा प्रवक्ते सुनील पुनवटकर यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!