ब्रेकिंग

‘अमृत’ने घेतला युवकाचा बळी

 

खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू, मजिप्रा व ठेकेदाराची मनमानी

यवतमाळ : यवतमाळकरांना चोविस तास पाणी मिळावे म्हणून अमृत योजना मंजुर करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून या योजनेचे काम सुरु आहे. अजुनही ही योजना पुर्णत्वास आली नाही. शहरातील चर्च समोरील संगम चौकात जीवन प्राधिकरणाच्या वतीने पाईपलाईनचे काम सुरू आहे. सोमवारी सकाळी एका 35 वर्षीय युवकाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटदाराकडून कुठलीच सुरक्षेची उपायोजना करण्यात आलेली नाही. शिवाय पाईपलाईनचे काम आराखड्यानुसार होत नसल्याने नागरी वस्तीमध्ये खड्डे खष्टु खादण्याची वेळ आली आहे. अजूनही सुरू न झालेल्या योजनेच्या देखभाल-दुरुस्ती लाही सुरुवात झाली आहे. एक थेंब पाणी न आल्यानंतरही या योजनेतील भ्रष्टाचारावर कुणीच बोलायला तयार नाही. एकंदरच परिसरातील नागरिकांच्या भावना संतप्त असून संबंधित अधिकारी व कंत्राटदार या विरोधात गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!