महाराष्ट्र

मराठा सेवा संघ पुरोगामी विचाराचे विद्यापीठ-शरद मैंद

 

पुसद : १ नोव्हेंबर १९९० रोजी शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथील बैठकीत मराठा सेवा संघाची स्थापना केली. स्थापनेपासून पुरोगामी विचारांची बीजे रुजायला सुरवात झाली.आजमितीस मराठा सेवा संघ म्हणजे पुरोगामी विचाराचे चालते बोलते वटवृक्षरुपी विद्यापीठ असल्याचे प्रतिपादन पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैद यांनी केले.
मराठा सेवा संघाच्या कार्येकर्ता प्रशिक्षण शिबिर व गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. हॉटेल अनुप्रभा येथील सभागृहात आयोजित शिबिरातील व्यासपीठावर अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक, प्रा.विजयराव माने, माजी जि.प. सदस्य साहेबराव कदम पाटील, सरपंच रवींद्र महल्ले, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिगांबर जगतापर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ. किरण सरनाईक यांनी विचार व्यक्त केले. शिबिराच्या प्रथम सत्रात उदघाटक शरद मैंद,सुधिर देशमुख दिग्रस, नगरसेवक राजू साळुंखे, शिवाजीराव देशमुख, तालुकाध्यक्ष प्रभाकर टेटर,दिगम्बर जगताप हे व्यासपीठावर उपस्थित होते. जिजामाता यांचे प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन,दीपप्रज्वलन करून प्रथम सत्रास सुरवात झाली. यावेळी प्रथम आसावरी नितीन पवार या चिमुकलीने जिजाऊ वंदनेचे उत्कृष्ट सादरींकारण केले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता प्रा.प्रेमकुमार बोक्के यांनी दोन्ही सत्रात विचार व्यक्त केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख,जिल्हा सचिव सुरेश कदम,नितीन पवार,पंडितराव देशमुख,हरगोविंद कदम,प्रविण कदम,हरिभाऊ ठाकरे,सोनू पाटील,प्रकाश बेदरे, शिवाजी कदम,श्रीकांत देशमुख, अशोक तायडे,विजय खोडके,सुधाकर सरकचौरे,बाळासाहेब साबळे, पंजाबराव चांद्रवंशी, अजित लोंढे,अक्षय तावडे,गजानन भोगे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा शुभांगी पाणपट्टे,मंदा इंगोले,सुनंदा वांझळ, उजवला खंदारे,वर्षा असोले,सीमा असोले,हेमा काकडे उपस्थित होते. संचालन यशवंतराव देशमुख यांनी केले. प्रास्ताविक सुधिर देशमुख यांनी तर आभार नितीन पवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!