निरज वाघमारे यांना नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड तर्फे ‘डॉक्टरेट’

यवतमाळ : येथील निरज वाघमारे यांना सण २०२१ चा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड २०२१ मार्फत अकॅडमी ऑफ युनिव्हर्सल पीस (अमेरिका) चा यंदाचा ‘नेल्सन मंडेला नोबेल पीस पुरस्कार’देत त्यांना डॉक्टर ही पदवी जाहीर केली.
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे हॉटेल ताज येथे ४ सप्टेंबर रोजी अकॅडमी ऑफ युनिव्हर्सल पीस (अमेरिका) यांचा यंदाचा नोबेल पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा साठी ऑक्सफर्ड हायर अकॅडमीचे कुलगुरू डॉ. मधु क्रिशनन, महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे मानद व वाणिज्य दूत सुहास मंत्री, गुजरात राज्याचे पोलीस महासंचालक अनिल प्रथम, प्रसिद्ध पार्श्व गायक उदित नारायण, डी. एन. शर्मा, डॉ. शैलेंद्र सिंग, बॉलिवूड गायक मधूश्री, बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी, ग्लोबल महिला व व्यवसाय या नियतकालिकाच्या संपादिका आदेशोला हिलेन ओनाडीपा, झाराईन मांचंदा फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाराईन मांचंदा उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातून यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते निरज वाघमारे यांना सामाजिक क्षेत्रातील नामांकन देऊन त्यांना गौरविण्यात आले.