ब्रेकिंग

नदीत पाच युवक बुडाले. दिग्रस शहरात शोककळा

 

 

 

राहुल वासनिक/ यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील १२ युवक नागपूर येथील ताजुद्दीन बाबा यांच्या शाही संदल साठी गेले होते. कन्हान नदीपात्रात काही युवक आंघोळीसाठी गेले होते. यामघ्ये नदीपात्रात पाच युवक बुडाले. ही घटना आज ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. राज्य राखीव पोलीस बल नागपूर पथकाकडून युद्घस्तरावर शोधकार्य सुरु आहे. पाच पैकी एका युवकाचा मृतदेह आढळला असून, उर्वरीत चार युवकांचा शोध लागला नाही. या घटनेने दिग्रस शहरात शोककळा पसरली आहे.
सैय्यद अरबाज (२१),ख्वाजा बेग (१९), सप्तहीन शेख (२०), अय्याज बेग (२२), मो. आखुजर (२१) सर्व रा. बाराभाई मोहल्ला दिग्रस अशी नदीत बुडालेल्या युवकांची नावे आहे. दिग्रस येथील १२ तरुण नागपूर येथे खाजगी वाहनाने ताजुद्दीन बाबा यांच्या शाही संदल साठी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास निघाले होते.पहाटे नागपूर स्थित दर्गाहवर पोहचल्या नंतर ते सर्व जण कामठी येथील दुसऱ्या दर्गाह येथे गेले होते. त्यानंतर सैय्यद अरबाज (२१),ख्वाजा बेग (१९), सप्तहीन शेख (२०), अय्याज बेग (२२), मो. आखुजर (२१) सर्व रा. बाराभाई मोहल्ला दिग्रस हे युवक कन्हान नदीत आंघोळीला उतरले. अशातच सदर युवक अचानक वाहून गेले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना शोधण्याचे कार्य सुरु केले. मात्र त्याचा शोध लागला नाही. अखेर पोलिसांनी राज्य राखीव बलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने नदीत बुडालेल्या युवकांचे शोधकार्य सुरु केले आहे. वृत्त लिहेपर्यत एका युवकाचा मृतदेह आढळला होता. या घटनेने दिग्रस शहरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!