आरोग्य व शिक्षण

कंत्राटी परिचारिका राबते आठवडाभर

 

मर्जीतील परिचारिकांची  एक दिवस ड्युटी,हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार,यवतमाळ तालुका आरोग्य अधिका-यांचे आदेश

 

यवतमाळ : तालुक्यातील हिरवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका कंत्राटी परिचारिकेची सतत आठवडाभर ड्युवटी लावण्यात आली आहे. तर उर्वरीत ११ परिचारिकांना प्रत्येकी एक दिवस ड्युवटी लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यातील हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात राजकिय वरदहस्त संचारल्याने येथिल आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. संबंधित अधिकारी मर्जीतील परिचारिकांना आठवड्यातून केवळ एक दिवस कर्त्यव्य बजावण्याचे आदेश दिले आहे. तर सदैव प्रामाणिक कर्त्यव्य बजाविन्याऱ्या कंत्राटी परिचारिकेस सतत आठवडाभरही १० तास सेवा देण्याचे फर्मान तालुका आरोग्य अधिकारी यांनी आदेश काढले आहे.
कोरोना आजारासोबतच डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात राजकिय मर्जी जोपासत राजकारण्यांनी सांगितल्या प्रमाणे बाकी परीचारकाना अकरा दिवसात एक दिवस सेवा देण्याचे आदेश काढला आहे. तर प्रामाणिक कर्त्यव्य बजावित असतात ज्यांचे कोणी बोलणार नाही अश्या कंत्राटी परिचारिकेस मध्ये कुठेही खंड न ठेवता लगातार एकरा दिवस सेवा बजाविण्याचा आदेश दिनांक २६ ऑगस्ट रोजी निर्गमित केले आहे. बाकीच्यांना आठ दिवसात एक दिवस आणि एकाच परीचारिकेला सतत सेवा देण्याचे फर्मान या मागील कारण काय? असा सवालही उपस्थित होत आहे. गावातील सुज्ञ नागरिक व ग्राम पंचायत सदस्य या परीचारकावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना विचारणा केली असता माझ्या हातात काहीच नाही असे सांगितले. या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना विचारणा करा असे व्यक्तव्य करून वेळ मारून नेली. येथिल आरोग्य सेवेवर वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याने या आरोग्य केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या रुग्णाची गैरसोय होत आहे. येथिल एकाधिकार पद्धत शासन नियमाला डावलून करीत असून प्रामाणिक कर्मचाऱ्यावर अन्याय करणारा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!