ब्रेकिंग

महीलेच्या नावाने ‘हनी ट्रॅप’ , दिल्लीच्या डाॅक्टरची दोन कोटीने फसवणूक

राहुल वासनिक / यवतमाळ

सोशल मीडियाच्या माध्यमातुन ओळख निर्माण करुन दिल्लीच्या डाॅक्टरची चक्क ०२ कोटी रुपयाची  फसवणूक केल्याचा धक्कादायक  प्रकार उजागर झाला. यवतमाळ पोलिसांनी  अवघ्या २४ तासाच्या आत गुन्ह्याचा उलगडा करुन आरोपीला बेड्या ठोकल्या.

संदेश अनिल मानकर असे आरोपीचे नाव आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातुन यवतमाळ येथील एका तरुनीने दिल्ली येथिल नामांकित डॉक्टरसोबत मैत्री पुर्ण संबंध प्रस्तापित करुन त्यांचे कडून दोन कोटी रोख रक्कम, मौल्यवान दागीण्यांची भेट स्विकारली.  त्यांनतर स्वताचे अकाउंट अचानक बंद केल्याने स्वताःची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने थेट यवतमाळ गाठत पोलीस अधिक्षक कार्यालय यवतमाळ येथे समक्ष येउन आपली आपबीती सांगितली. सदर तक्रारीचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक यवतमाळ यांनी त्वरीत उपविभागिय पोलीस अधिकारी, यवतमाळ व सायबर सेल यांना घटणेची शहानिशा करुन आरोपी निष्पन्न करण्याबाबत निर्देशित केले. त्या अनुषंगाने सायबर सेल यवतमाळ, यांनी तक्रारदार यांनी फसवणुक करणारे महीलेची माहीती घेवुन तांत्रीक विश्लेषण केले.  डॉक्टरची फसवणुक करणारी महीला नसुन तो पुरुष असल्याची प्राथमीक माहीती प्राप्त झाली. प्राप्त माहीतीच्या आधारे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक गठीत करुन अरुणोदय सोसायटी येथील एका घरी किरायाणे राहणान्या इसमाचे घरी धाड टाकली.  सदर ठिकाणी आरोपी  संदेश अनिल मानकर नावाचे इसमाकडुन एक कोटी बाहत्तर लाख सात हजार रुपये नगदी व चार लाख रुपयाचे सोन्याचे दागीणे तसेच चार विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण १,७८,०६, १९८ (एक कोटी अठठयाहत्तर लाख सहा हमार एकशे अठठयांनउ रुपये ) चा मुद्देमाल जप्त करण्यात यवतमाळ पोलीसांना यश आले.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ , अपर पोलीस अधिक्षक  डॉ. के. ए. धरणे  यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल पुरी, सायबर सेल, सपोनि गजानन करेवाड, पोहवा गजानन डोंगरे, पोना विशाल भगत, उल्हास कुरकुटे, कविश पाळेकर, पोकों महमद भगतवाले, सलमान शेख, किशोर झेंडेकर, पंकज गिरी सर्व पोलीस अधिक्षक कार्यालय, यवतमाळ यांनी पार यशस्वीरीत्या पार पाडली.

सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

नागरीकांनी सोशल मीडीयाचा वापर करतांना अनोळखी व्यक्तीवर त्वरीत विश्वास ठेवल्याने त्यांना किती मोठी किंमत मोजावी लागु शकते हे या घटनेतून स्पष्ट होते. त्यामुळे  नागरीकांनी सोशल मीडीयाचा वापर करतांना सावधगीरी बाळगावी असे आवाहन पोलीस अधिक्षक डाॅ दिलीप  पाटील भुजबळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!