महाराष्ट्र

ढाणकी नगरपंचायत : डम्पिंग ग्राउंड मान्यता नसताना दिले 1 करोड 40 लाख

 

फयाज शेख / उमरखेड

घनकचरा उचलण्या करीता एक वर्षाला ठेकेदारा ला 1 करोड 40 लक्ष रुपये नगरपंचायत ढाणकी ने मंजूर केल्याने अनेक नागरिक नगरपंचायतीने घेतलेल्या या निर्णया विरुद्ध नाराज दिसून येत आहे. नगरपंचायत ने शहरातील घण कचरा उचलण्या करीता दिलेल्या निविदे मध्ये फक्त 5 घन कचरा गाडी 2 ट्रॅक्टर 3 सायकल रिक्षे आहेत प्रत्येक्षात मात्र एवढी वाहन रस्त्यावर कचरा उचलताना दिसून येत नाहीत निविदे मध्ये ढाणकी नगरपंचायतीने घालून दिलेल्या 2 करोड रुपये स्लन्सीच्या अटीमुळे व इतर शर्ती मूळे अनेक घनकचरा ठेकेदाराने नगरपंचायत च्या निविदे कडे पाठ पुरवल्याचे विशिष्ठ ठेकेदाराला लाभ मिळून देण्या करीता जाचक आटी लादल्याचे नगरसेवक खाजगीत बोलत आहे.
नगरपंचायत कडे शहरातील कचरा संकलन करण्यासाठी स्वतःची जागा नसताना सुद्धा घनकचरा टेंडर देण्यात आल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहे. नियमा प्रमाणे सर्व प्रथम शहरातील जमा होणार कचरा टाकणारी जागा उपलब्ध करणे बंधन कारक आहे. नियमाला फाटा देत विशिष्ठ लोकांना आर्थिक लाभ मिळून देण्या करीता अत्यंत घाई घाईत वाघमारे या ठेकेदारा च्या घश्यात लाखोचा ठेका करोडो मध्ये दिल्याची दिसत आहे. स्वतःची जागा समजून खरूस गावाजवळील ई वर्ग जमिनीवर शहरातील घाण कचरा टाकल्या जात होते. परंतु खारुस येथील नागरिकांनी गावाशेजारी रस्त्या लगत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याला विरोध करत त्वरित कचरा टाकणे बंद करण्याची मागणी केली होती. खरूस गावातील नागरिकाचा वाढता विरोध पाहून आता कुठे नगरपंचायतीने महसूल विभागाला घाण कचरा टाकण्या साठी त्यांच्या मालकीची जागा मागितली त्यामुळे काही दिवसापूर्वी खरूस गावा शेजारील भीम टेकडी जवळील सरकारी जागे ची मोजणी केली. महसूल विभाग नागरपंचायतीला कचरा संकलन करण्या करीता जागा देणार का? सर्व प्रथम नगरपंचायतीने कचरा संकलन करण्या करीता ग्राउंड उपलब्ध करणे गरजे चे होते मात्र ते न करताच अत्यंत घाई घाईत घनकचरा निविदा मंजूर करण्यात आली. त्यानंतर घनकचरा करीता डॅम्पनिग ग्राउंड शोधणे सुरु केले.
डम्पिंग ग्राउंड मध्ये आणलेल्या कचरा तीन प्रकारा मध्ये वेगळा करणे आसा नियम असताना ठेकेदार मात्र नियम धाब्यावर बसवत जमा केलेला सर्व कचरा एकत्र टाकत आहे त्यामुळे नगरपंचायतने घालून दिलेल्या आटी शर्ती चा भंग होत आहे. त्यामुळे चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाही हि मागणी नागरिक करत आहे.
नगरपंचायत ठेकेदारावर कारवाही करत नसल्याने जिल्हाधिकारी याकडे लक्ष देऊन नियम ढाब्यावर बसवत काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाही करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

खरूस मेट येथील नागरिक अनेक वर्षा पासून शासनाच्या इ वर्ग या जमिनीवर शेती कसत आहे. त्यापासून मिळणाऱ्या पैस्यातुन कुटुंबाचे पालन पोषण होत असे सदर जमिनीवर घनकचरा ग्राउंड वर डम्पिंग ग्राउंड केल्यास जमीन कस्त असलेले शेतकरी बेरोज गर होतील व अनेक उघड्यावर येतील त्यामुळे सदर डंपनिंग ग्राउंड इतरत्र करावे.
विक्रम राठोड
जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा यवतमाळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!