क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

संस्कृतीचा प्राण साहित्यात असतो. – डॉ. वसंत शेंडे

अमरावती :
साहित्य हजारो वर्षे मारत नाही किंवा मरू दिले जात नाही. एक काळ होता जेव्हा कागदाचा शोध लागला नव्हता तेव्हा कलावंतांनी दगडावर लिहून आपल्या भावना व्यक्त केल्यात. सम्राट अशोकाच्या काळात शिलालेख लिहिल्या गेलेत म्हणून आपल्याला तत्कालीन सांस्कृतिक इतिहास माहित झाला. त्यामुळे साहित्य हे अद्वितीय असते आणि संस्कृतीचा प्राण साहित्यात असतो असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. वसंत शेंडे यांनी केले. ते ‘आशय’ या संस्थेद्वारे आयोजित अ.भा.आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या तिसऱ्या आंबेडकरी संवाद संमेलनात परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.

स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ,न्याय आणि विज्ञान ही उत्क्रांत माणसांनी शोधलेली जीवनसूत्रे असून या सूत्रांवर आधारित जीवन जगायचे की अलौकिकतावाद आणि अंधश्रद्धांवर आधारित जीवन जगायचे हे आपण ठरवलं पाहिजे असेही डॉ. शेंडे म्हणाले. साहित्यात कुणीतरी काडी करून ठेवतं आणि त्याचे परिणाम पुढच्या हजारो पिढ्यांना भोगावे लागतात. काडी ही प्रथमतः साहित्यात होते तिथून ती नाटक, संगीत , शिल्पकला, चित्रकला इत्यादी कलांमध्ये येते . या सर्वांचा शोध आंबेडकरी साहित्यिकांनी घेतला पाहिजे. आंबेडकरी माणसं राजकारण करतात पण या राजकारणी लोकांमध्ये अजिबात संवाद नसतो. हा संवाद वाढला पाहिजे आणि विविध क्षेत्रात काम करणारी माणसं एकत्र आली पाहिजे यासाठी स्मृतिशेष प्रा. सतेश्वर मोरे यांची धडपड होती अशी कृतज्ञता सुद्धा डॉ. शेंडे यांनी व्यक्त केली.

” आंबेडकरी सामाजिक सांस्कृतिक आंदोलन आणि सतेश्वर मोरे : एक दृष्टिकोन ” या परिसंवादात डॉ. वामन गवई , डॉ. मनोहर नाईक , डॉ. चंद्रकांत सरदार, ऍड.अभय लोखंडे यांनी सुद्धा आपले समयोचित विचार व्यक्त केले. परिसंवादाचे सूत्रसंचालन संघपाल सरदार यांनी तर आभार धर्मशील गेडाम यांनी मानले. यावेळी डॉ.सीमा मोरे, प्रशांत वंजारे,संजय मोखडे, कुंदाताई सोनुले, अण्णा वैद्य, विक्रांत मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोविडविषयक नियमांचे काटेकोर पालन करून आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे अध्यक्ष ऍड. दिलीप यडतकर हे होते तर संमेलनाचे उदघाटन आनंद गायकवाड यांनी केले. बहारदार कविसंमेलन सुद्धा या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!