ब्रेकिंगराजकीय

यवतमाळात नारायण राणे यांचे पोस्टर चपलेने तुडविले

 

राणेंच्या  बेताल वक्तव्या विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन

यवतमाळ :

केन्द्रात नव्यानेच मंत्री झालेले तसेच भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले आहे. दरम्यान या वक्तव्याच्या विरोधात शिवसैनिक संतप्त झाले असून आज यवतमाळात नारायण राणे यांचे पोस्टर चपलेने तुडविण्यात आले. स्थानिक दत्त चौकात जमलेल्या शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करुन नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून दिसेल तिथे बदडणार असल्याचा इशारा दिला आहे.

भाजपा नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री यांना कानपटीत मारण्याची भाषा वापरली आहे.स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणा-या भाजपातील नेते कधी शेतक-यांना साले म्हणतात तर कधी प्रधानमंत्र्यांना बैल म्हणत आहे. या अशा वक्तव्यांमुळे येणा-या निवडणूकीत भाजपाला त्याचे परीणाम भोगावे लागतील, आणि शिवसेना आणखी ताकतीने राज्यातील एक नंबरचा पक्ष बनेल असे वक्तव्य शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी दत्त चौकातील आंदोलन प्रसंगी केले. माननीय पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी आम्हाला संयम ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र नारायण राणे यांना शिवसेनेच्या विरोधात भुंकण्यासाठी केन्द्रात मंत्रीपद देण्यात आले. आता हेच नारायण राणे बेताल वक्तव्य करीत असल्याने शिवसैनिक सुध्दा पेटून उठला आहे.आम्ही पक्षप्रमुख उध्दवसाहेबांचा अपमान सहन करणार नसल्याचे सुध्दा पराग पिंगळे यांनी स्पष्ट केले आहे. नारायण राणे हे भाजपाने सोडलेला कुत्रा आहे आणि स्वस्त लोकप्रियता मिळविण्यासाठी तो भुंकत फिरत आहे. राज्यात भाजपाला जे शक्य झाले नाही ते मिळविण्यासाठी नारायण राणे यांच्या माध्यमातून भुंकणे सुरु केले आहे. यवतमाळात आले असते तर चपला, जोड्याने मारुन त्यांना पाठविले असते असा संताप शिवसेना जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड यांनी व्यक्त केला. कोरोणना संकटात सुध्दा उध्दवजी ठाकरे यांनी चांगले काम करुन नागरीकांचे जीव वाचविले. तरीही नारायण राणे हे उध्दवजी ठाकरे यांच्या विरोधात पातळी सोडून बेताल वक्तव्य करीत आहे. शिवसैनिक हे सहन करणार नाही. नारायण राणे यांचा एनकाऊंटर होण्यापासून शिवसेनेने त्यांना वाचविले होते. आता मात्र शिवसैनिकच राणे यांचा एनकाऊंटर केल्याशिवाय राहणार नाही असा संताप शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी व्यक्त केला.या प्रसंगी नारायण राणे यांचे पोस्टर्स चपलेने तुडविण्यात आले. प्रचंड घोषणाबाजीने परीसर दुमदुमून निघाला होता. त्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी राणेंचे पोस्टर्स आग लावून पेटवून दिले. या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे,तालुका प्रमुख संजय रंगे,शहर प्रमुख पिंटु बांगर,बोरी शहर प्रमुख रवी जाधव,युवासेना उपजिल्हा प्रमुख गिरीजनांद कळंबे,ऍड अभिजित बायस्कर,जिल्हा परिषद सदस्य डॉ बी एन चव्हाण,रामराव काका नरवाडे,राजू राठोड,संदीप सरोदे,गणेश आगरे,पुरुषोत्तम टिचुकले,अशोक पुरी,गिरीष व्यास, प्रविण निमोदीया,विशाल गणात्रा, प्रसन्न रंगारी, अशोक पुरी, गजानन इंगोले, सागरताई पुरी,
निर्मलाताई विनकरे, ज्योती चिखलकर,मंदाताई गाडेकर,गार्गी गिरडकर,,पंकज देशमुख,उद्धवराव साबळे,निलेश बेलोकर,संतोष चव्हाण,खुशाल गेडाम,फिरोज पठाण,श्याम थोरात,राजू राऊत,रुपेश सरडे,गोलू जोमदे,अतुल बोबडे,रवी राऊत,तुषार देशमुख, पवन शेंद्रे,बिल्ला सोळंकी,शंकर देऊळकर,कृष्णराव इरवे,पद्माकर काळे,गोलू मिरासे,बाळासाहेब जयसिंगपूरे,सचिन बारसकर,राजेश टेम्भरे, शैलेंद्र तांबे, अमोल धोपेकर,दीपक सुकळकर,विनायक फुल्लूके,अनिल यादव, मनीष लोळगे,शैलेश गाडेकर,निलेश लडके,राजेश मेहरे, विनोद राऊत, रवि राऊत, रुषी इलमे, ज्योती चिखलकर, सतिश सकट,दिलीप तराळ तसेच अनेक शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!