महाराष्ट्र

‘उघड्यावरच जगलो, उघड्यावरच मरणार…?’

 

घाटंजी :
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत “सर्वासाठी घरे २०२२” पर्यंत असे केंद्र सरकारने जाहीर केले. मात्र या योजनेपासून आजही शेकडो पात्र लाभार्थी वंचित आहेत त्यांना घरकुल मिळालेले नाही. योजनेचा कालावधी संपत चाललेला आहे, त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. घरकुल मिळणार की नाही असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे घाटंजी नगर परिषदेवर घरकुल धडक मोर्चाचे आयोजन  करण्यात आले होते. प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या ७ फेब्रुवारी २०१९ च्या परिपत्रकानुसार केंद्र व राज्य सरकारने बेघरांना २०२२ पर्यंत घरे देण्याची महत्वकांक्षी मोहीम हाती घेतली असून राज्यातील नगरपरिषदांना आदेश देखील देण्यात आले होते. ज्यात अतिक्रमणदार महत्वाचा घटक आहे. ज्यांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्यास त्यावर उपाय सुचविले आहेत. सदर परिपत्रकात भाडेपट्टीची जागा मर्यादा ते अनुसूचित जाती जमाती बाबत देखील अनेक निर्देश दिलेले आहेत. १५०० चौ. फु. जागेची मर्यादा आखलेली आहे. अशा परिवारांचे, कुटुंबाचे मूल्यमापन नगरपरिषदेला करण्याचे आदेश दिले गेले आहेत. मात्र आज पर्यंत लाभार्थ्यांना लीज पट्टे मिळालेले नाही.
घाटंजी येथील सध्याची स्तिथी बघिल्यास येथे १५०० च्या जवळपास लाभार्थ्यांना भाडे घर पट्टे मिळालेले नाहीत. अर्थात त्यांच्या कडून करवसुली होत आहे. हे सर्व अतिक्रमणदार वरील योजनेचे लाभार्थी आहेत मात्र अद्यापही त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. दोन लाख साठ हजार रुपयांचे घरकुल मिळालेले आहे त्यापैकी एक लाख एवढीच रक्कम मिळालेली आहे उर्वरित रक्कम बांधकाम पूर्ण करूनही मिळालेली नाही ती तात्काळ देण्यात यावी. तसेच ज्यांना जागा, घर नाही भाड्याने राहतात त्यांच्यासाठी फ्लॅट सिस्टिम करून घरकुल देण्याचे प्रावधान या योजने मधे आहे. तरी आजपर्यंत यावर कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही. कृपया तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. या मोर्चात सामाजीक कार्यकर्ते महेश पवार, गजानन भालेकर, नगर परिषद सदस्य, निखिल देठे, युवानेते, आणि घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!