आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

शिक्षक प्रदीप जाधव ठरले विद्यार्थ्यांसाठी शिक्षणदूत

यवतमाळ :

प्रदीप जाधव हे घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते बुलढाणा जिल्ह्यात सेवा बजावत आहे. शासकीय शाळेतील शिक्षक म्हणजे केवळ पगारासाठी काम करणारा कर्मचारी हि व्याख्या मोडीत काढणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांपैकी एक. जिथे नियुक्ती होऊ नये म्हणून अनेक शिक्षक जीवाचा आटापिटा करतात, अशा दुर्गम भागातील आदिवासी पोडावरील शाळेचा चेहरामोहरा बदलणारे व अवघ्या काही काळातच राज्यातील दखलपात्र शाळांमध्ये गणना होईल अशी नाविन्यपूर्ण संकल्पना मांडणारे धडपडे शिक्षक म्हणजे प्रदीप जाधव. त्यांच्या उपक्रमांची यादी मोठी आहे.

लॉकडाउनच्या काळात ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रचंड हाल झाले. मोबाईल व इंटरनेट सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले नाही. मात्र प्रदीप जाधव स्वस्थ बसले नाहीत. ज्यांच्याकडे सुविधा आहे त्यांच्यासाठी नियमित ऑनलाईन क्लास व जे गरीब आहेत त्या विद्यार्थ्यांना घरी जाऊन त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. आजही त्यांचे १०० टक्के विद्यार्थी ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातून शिक्षण घेत आहेत. आपल्या कर्तव्याची जाण व विद्यार्थ्यांप्रती आपुलकी असेल तरच हे शक्य होऊ शकते.

प्रदीप जाधव यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही प्राप्त झाला आहे. गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून शिक्षण घेता यावे. यासाठी त्यांची धडपड अजूनही सुरु आहे. Teachmint च्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. नाविन्यपूर्ण व उपक्रमशील शिक्षकांची एक स्पर्धा Teachmint ने आयोजित केली आहे. यामध्ये प्रदीप जाधव देखील सहभागी आहेत. आपण काही सेकंदांचा वेळ काढून खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून त्यांना आपले अमूल्य मत दिल्यास त्यांचा उत्साह व प्रयत्न द्विगुणित होतील. तसेच इतरांनाही आपण मत देण्यास प्रवृत्त केल्यास या शैक्षणिक कार्यास आपला हातभार लागेल.

मत नोंदवणे अगदी सोपे आहे…..

१) http://wshe.es/a9iMIM7X या लिंकवर क्लिक करा.
२) त्यानंतर आपला ईमेल टाईप करून Vote टॅब वर क्लिक करा.
३) जर आपल्या ब्राऊजर मध्ये Pop Up ब्लॉक असतील तर Show Always करा.
४) त्यानंतर फेसबुक आयडी व पासवर्ड टाईप करा.(हि लिंक पूर्णपणे सुरक्षित आहे).
५) आता आपले मत मान्य झालेले असेल. एका व्यक्तीला एकदाच मत देता येईल.
६) मत नोंदविण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. त्यामुळे लगेच आपले मत नोंदवा.

जर आपल्याला अडचण जात असेल तर खालील व्हिडीओ पाहावा. https://youtu.be/Bn7Phmx-8VA

आपले मत अवश्य नोंदवा – http://wshe.es/a9iMIM7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!