ब्रेकिंगराजकीय

‘त्या’ प्रकरणात माजी वनमंत्री आ.संजय राठोड यांना क्लिनचिट, खोळसाळपणे केली तक्रार, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. भुजबळ यांची पत्रकार परिषदेत माहिती

 

यवतमाळ :  घाटंजी तालुक्यातील एका महिलेच्या नावाने जिल्हा पोलीस अधिक्षक व घाटंजी पोलीस स्टेशन येथे रजिस्टर पोस्टाने तक्रार प्राप्त झाली होती. यामध्ये शिवसेना आमदार तथा माजी वनमंत्री संजय राठोड यांनी शारीरीक सुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता.  या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव यांच्या नेतृत्वात विशेष चौकशी पथक स्थापन केले होते. पथकाने महिलेचे इनकॅमेरा बयान नोंदविले आहे. या प्रकरणात आ. संजय राठोड यांचे बयाणनही पथकाने नोंदविले आहे. माजी वनमंत्री संजय राठोड यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपा संदर्भात क्लिनचिट देण्यात आली आहे.

घाटंजी तालुक्यातील एका महिलेने नोकरी लावण्याचे अमिष दाखवून शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप राठोड यांच्यावर करण्यात आला होता. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे. तसेच त्या अर्जावरील सही अर्जात नमुत केलेल्या महिलेची नाही. महिलेची राठोड यांच्याविषयी काहीही तक्रार नाही, असा जबाब नोंदविल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशीअंती माजीमंत्री व आमदार  संजय दुलीचंद राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठविलेला नाही.  या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेले आहे. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे. तक्रारीत नमुद असलेल्या महिलेची आमदार संजय राठोड यांच्या विषयी काही तक्रार नाही. नमूद महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीडपोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचे निष्पन्न झालेले आहे. अर्जात नमुद केलेल्या महिलेचा व महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी काहीएक संबंध नाही, असेही पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुंजबळ यांनी सांगितले आहे.

 

 

दोन इसमांनी पाठविले तक्रारीचे पॉकीट

जिल्हा पोलीस अधिक्षकांनी चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाने घाटंजी येथील पोस्ट ऑफीसमध्ये जावुन सदर पॉकीट कोणी पाठविले या संदर्भात चौकशी केली. महिलेच्या नावाने पाठविलेले पॉकीट दोन व्यक्तीने स्पीड पास्टाने पाठविल्याचे समोर आले आहे. मात्र ते दोन व्यक्ती कोण होते हे अजुनही समोर आले नसल्याचे माहिती पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!