महाराष्ट्र

चिकणीच्या प्रविण घरडे यांची पुण्यात सामाजिक बांधिलकी

स्वातंत्र्य दिनी रक्तदान शिबिर, ७६ जणांनी केले रक्तदान

नेर : तालुक्यातील चिकणी डोमगा येथील प्रविण घरडे या युवकाने पुणे येथे विविध कार्यक्रम घेवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. स्वातंत्र्य दिनी पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ७६ जणांनी केले रक्तदान केले आहे.
कांचन मुव्हिज पुणे, नगरसेविका उषामाई काळे यांच्या संयुक्त विद्यमाने काशिनाथ लक्ष्मण बनसोडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्वातंत्र्य दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी सिने अभिनेत्री गिरीजा प्रभू,सिने दिग्दर्शक शिवा बागुल, अकील मन्सुरी, सचिन चुनिदास, सचिन खुळे यांनी रक्तदानाची सुरवात केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महापौर उषामाई ढोरे, न्यायमुर्ती चद्रलाल मेश्राम, सिने अभिनेता सुनिल गोडबोले, अभिनेता प्रशांत तपस्वी, अभिनेता आशितोष वाडकर, अभिनेत्री तेशवानी वेताळ, अभिनेता काळुराम ढोबळे, उद्योगपती बाळासाहेब बागर, मगेश शिरसाठ, उद्योगपती राजेद जानराव, नगरसेविका निताताई पाढाळे, नगरसेवक संतोष कोकणे, विशाखा गायकवाड, उद्योगपती दत्ता दळवी उपस्थित होते. याप्रसंगी मुंबईचे राज्यकर उपायुक्त मेहबुब कासार, पोलिस आयुक्त धनंजय धोपावकर , अर्जु सोनवने यांनी रक्तदान केले. अभिनेता गायक अविनाश कीर्तीकर यांनी देशभक्ती हिंदी गीते सादर केली. फिरोज मुजावर हयांनी न्यृत्य सादर केले. सदर रक्तदान शिबीराला मधुकर काळे, नगसेविका उपामाई काळे, प्रमोद महाले, सुरेश सकपाळ, प्रदिप कपीले, विद्याताई ठिपसे, राहुल भिंगारे, उमेश मोडक,. अतुल वाघ, भागवत डामरे, चिंदानद कारले, दिपक पाटिल यांचे सहकार्य लाभले.

गौरव सन्मान पुरस्कार
नेर तालुक्यातील चिकणी डोमगा येथील रहिवासी असलेल्या प्रविण बबन घरडे हा युवक पुणे येथे स्थायिक झाला आहे. त्या ठिकाणी कांचन मुव्हिज अंतर्गत लघुपट तयार केले आहे. १५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन पुणे येथे केले होते. त्या निमित्त प्रविण घरडे यांच्या सामाजीक व आरोग्य कार्यातील योगदानाबददल ‘गौरव सन्मान पुरस्कार’ धनश्री ग्रृप कंपनी व जयेश गायकवाडच्या वतीने जेष्ठ अभिनेता सुनिलजी गोडबोले व ईतर सर्व मान्यवराच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!