ब्रेकिंग

तवेराच्या अपघातात तीन ठार

 

पुसद : मध्यप्रदेशातील कालकोंड येथील पाच जण तवेरा या वाहनाने पुसद तालुक्यातील एका गावात मुलगी पाहण्यासाठी जात होते. दरम्यान खंडाळा घाटात तवरा या वाहनाला अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा मृत्यु झाला असून, दोन जण जखमी झाले.
अशोक खोंदरे (४५) रा.अंबासेल जिल्हा हरदा मध्य प्रदेश ,अनंत पाटील (४५) रा. कालधड जिल्हा खंडवा मध्यप्रदेश ,अरविंद बाडे (२५) रा.मिसालिया जिल्हा खंडवा मध्यप्रदेश असे मृतकाचे नाव आहे. रामशंकर निर्भयादास खादे (५०) रा.कालकोंड जिल्हा हरदा ,शेरसिंग राजपूत (३०) रा.भवान्या जिल्हा खंडवा असे जखमीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पुसद ग्रामिण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदना करीत उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे नेण्यात आले. तर जखमींना मेडिकेयर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पुसद येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे. पुढील तपास पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!