महाराष्ट्रराजकीय

राज्यमंत्री बच्चू कडू यांचे विभागीय उप महाप्रबंधकाला पत्र

महागाव स्टेट बँकेतील पिक कर्ज प्रकरणे तत्काळ निकाली काढा

महागाव :

शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप वेळेवर होत नसुन पिक कर्ज वाटपाला दिरंगाई होत असल्याने कर्ज मंजुरीचे अधिकार महागाव शाखेला देवुन पीक कर्ज प्रकरणे तत्काळ काढावीत असे पत्र राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु यांनी उप महाप्रबंधक यांना दिले आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या महागाव शाखेत पिक कर्ज वाटप सुरू असुन कर्ज प्रक्रिया करतांना कर्ज मंजुरीचे अधिकार सदर शाखेला नसल्याने हे पिक कर्ज मागणीचे प्रकरणे दारव्हा किंवा इतर शाखेत पाठविले जात असल्याने कर्ज वाटप प्रक्रियेला दिरंगाई होत आहे. त्यामुळे महागाव शाखेलाच कर्ज मंजुरीचे अधिकार असायला पाहिजे जेणे करून पिक कर्ज वाटप प्रक्रिया जलद होईल. शेतकऱ्यांना कर्ज मिळेल व त्रास होणार नाही असे निवेदन प्रहार च्या वतीने वारंवार देण्यात आले. परंतु याला बँक प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिस्थितीचा सहानुभूती पुर्वक विचार करून महागाव शाखेत असलेले पीक कर्ज वाटप प्रकरणे तत्काळ निकाली लावण्यात यावी यासाठी पिक कर्ज मंजुरीचे अधिकार महागाव शाखेला देण्यात यावे अशा आशयाचे पत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भारतीय स्टेट बँकेचे विभागीय उप महाप्रबंधक यांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!