राजकीयविदर्भ

रस्त्यावर खड्ड्यात सोडले मासे

 

नगर परिषद प्रशासना विरोधात आंदोलन

यवतमाळ :
यवतमाळ – दारव्हा मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने आज अखेर येथील स्थानिकाच्या वतीने या खड्ड्यामध्ये मासे सोडून स्थानिक नगरपरिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
यवतमाळ शहरातील दारव्हा रोड हा पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती अकोला यांसारख्या मोठ्या शहरांना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते.
महामार्ग काठावरील मद्यविक्रीचे दुकाने हटविण्याच्या शासन निर्णयामुळे स्थानिक नगर परिषद प्रशासनाने शहरातील हा मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगर परिषद प्रशासनाकडे हस्तांतरित करून घेतला होता. या नंतर सदर रस्त्यावरील नियंत्रण हे नगर परिषद प्रशासनाकडे आले. त्यामुळे सदर रस्त्यावरील डागडुजी व नियंत्रण नगरपरिषद कडे आहे. मात्र यवतमाळ येथील नगरपरिषदेच्या असलेला अस्ताव्यस्त कारभार यामुळे सदर रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे. एकीकडे शहरातील सर्व रस्त्यांवर अमृत योजनेच्या खोदकामामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असताना दुसरीकडे दुर्लक्षित पणामुळे महामार्गवर पडलेले खड्ड्यांमुळे वाहनधारक पुरतेच वैतागून गेलेले आहे याविषयी वारंवार तक्रारी किंवा वृत्तपत्रांमधून वृत्त प्रकाशित होऊन ही याकडे संबंधित विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने आज आखेर येथील निरज वाघमारे यांच्या नेतृत्वात मित्र परिवाराच्या वतीने हे अभिनव आंदोलन करून संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी, रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकून त्यामध्ये मासे सोडीत स्थानिक नगर परिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी निरज वाघमारे सचिन राऊत, सुरज मेश्राम, लाडा इंगळे, रोशन मस्के, रोहन ढाकरगे, अमोल खंडारे, गजानन सलामे, संदेश भगत, कुणाल हातागडे, प्रदीप हातागडे, जित उमरे, नितेश बहाळे, सुमित खडसे, अमोल भिमटे,विशाल शेंडे, सोनू वरठी, आशिष वानखेडे, प्रणव राठोड, अनिकेत खेलकर, दानिश भाजीपाले, सुगत भगत, सुरज चतुरकर,अनिरुद्ध कांबळे, साहिल बहाळे, मोबिन खान, करण हातागडे, मनोज हातागडे, मुकेश सकट, प्रथमेश तायडे, अभिषेक गायकवाड यांच्या सह निरज वाघमारे मित्र परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते…

यवतमाळ नगरपरिषदच्या अस्ताव्यस्त आणि भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य यवतमाळकर जनतेला बसत आहे. नगर परिषदच्या अधिनस्त असलेल्या यवतमाळ – दारव्हा रोडची पूर्णपणे चाळण झालेली आहे. यातून बरेच लहान सहन अपघात सुद्धा घडत आहे. वारंवार नगर परिषद प्रशासनाशी पत्र व्यवहार करून या कडे दुर्लक्ष होत आहे. आता यापुढे या रस्त्यावर एखादा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल की काय.? असा प्रश्न आम्हाला पडला आहे..
– निरज वाघमारे
आंदोलनकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!