‘त्या’ पुरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी

वाकान, तिवरंग, मलकापूर ग्रामवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी युवा नेते गुणवंत राठोड यांचे पुनर्वसन मंत्र्यांना निवेदन
यवतमाळ : मागील अनेक वर्षांपासून नाल्याच्या पुराचे पाणी घरात शिरल्याने उदरनिर्वाहाचे संकट कोसळले होते. सध्याही तीच स्थिती आहे. गत तीन वर्षांपासून प्रशासनाने सदर गावाकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.याबाबत निवेदने देखील दिले आहेत. परंतु, प्रशासनाकडून कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते गुणवंत राठोड याबाबत पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांना निवेदन देत मागणी सोडविण्याबाबत मंत्र्यांना नुकतेच साकडे घातले आहे.
महागाव तालुक्यातील वाकान, तिवरंग,मलकापूर या तीन गावात 2005 ला महापूर आल्याने नाल्याच्या पूराचे पाणी गावात घुसल्याने नुकसान झाले होते. त्या नंतर 2017 मध्ये सुद्धा पूर आल्याने पुन्हा या 3 गावातील लोकांच्या घरात पाणी शिरले. नेहमी नेहमी प्रत्येक पावसाळ्यात छोटे मोठे पूर येतात त्या मुळे अत्यंत हाल होत आहेत.
2005 पासून प्रलंबित असलेली मागणी आता तरी पूर्ण व्हावी करिता या 3 गावातील नागरिक सरकार कडे अपेक्षेने पाहत आहे. वाकान येथिल सरपंच अशवजीत भगत यांनी ही मागणी लावून धरली असून मलकापूर येथील सरपंच तिवरंग येथील सरपंच यांची ही मागणी आहे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे करिता हिवरा सर्कल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते ताथा तिवरंग उपसपंच गुणवंत राठोड यांनी थेट मुंबई गाठत आपल्या सर्कल मधील ह्या गावचे पुनर्वसन व्हावे करीता पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटिवार साहेब यांना निवेदन दिले आहे.
महापूराशी लढतांना जिवित हानी होऊ शकते. तसेच अनेक नागरिक बेघर होतात. त्यांना आपला संसार पुन्हा थाटतांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो आहे. याबाबत शासनाने ह्या गावचे पुनर्वसन करून आम्हाला न्याय द्यावा.
-गुणवंत राठोड
उपसरपंच, तिवरंग
युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस