राजस्थानच्या व्यापा-यांनी 11 शेतक-यांना गडविले

मुकुटबन पोलीस स्टेशनला दुसऱ्यांदा तक्रार
झरी : राजस्थान येथील व्यापाऱ्यांनी तालुक्यातील सोनेगाव सह इतर गावातील 11 शेतकऱ्यांना 20 हजाराचे 2 लाख करून देण्याचे आमिष दाखवून गंडविल्याची घटना घडली.
राजस्थान येथिल दोन व्यापारी घोंसा येथे राहत आहे. झरी तालुक्यातील अनेक गावात ब्लॅंकेट, चादर ,कपडे व रेनकोट विक्रीचा धंदा करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे राजस्थानी व्यापारी राहत असुन त्यांनी शेकडो लोकांचे विश्वास संपादन केले. सुरवातीला काही शेतकऱ्यांना पैसे वाटप करून इतर शेतकऱ्यांनाचा विश्वस संपादन करुन पैशाचे वाटप केले. त्यामुळे इतरही शेतकरी याला बळी पडले. शेतकऱ्यांना 20 हजार द्या 15 दिवसात 2 लाख देतो असे आमिष दाखवून सोनेगाव ,रुईकोट,भेंडाळा गावातील 11 शेतकरी बळी पडले.राजस्थान येथील शहाबुद्दीन खान ,फकरू मुन्शी खान नामक इसमाजवळ प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे 2 लाख 20 हजार जमा करून दिले. पैसे जमा होताच राजस्थानी व्यापारी सण असल्याचे सांगून राजस्थान पसार झाले. 15 दिवसात 2 लाख मिळण्याची मुदत देण्यात आली होती. 4 महिने लोटूनही रक्कम मिळाली नसल्याने राजस्थानी व्यापारी यांना पीडित लोकांनी फोन केल्यास फोन बंद आला.त्यामुळे सर्वांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे फसवणूक झालेले शेतकरी यांनी 18 जुलै रोज राजस्थानी सावकारांच्या विरोधात ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु ज्या 11 शेतकऱ्यांचे पैसे मध्यस्थी करून घेतले व राजस्थानी लोकांना दिले त्या मध्यस्थी इसमाच्या व्यक्तीच्या विरोधात दुसरी तक्रार 9 ऑगस्टला दिली. मध्यस्थी करणारा व पैसे घेणारा तुळशीराम जुमनाके वय 60 वर्ष रा. सोनेगाव यांनी 11 शेतकऱ्यांचे 20 हजार प्रमाणे 2 लाख 20 हजार घेऊन विविध प्रलोभन देऊन राजस्थानी लोकांना दिल्याची तक्रार दिली आहे. तरी जुमनाके चौकशी करून राजस्थानी लोकांना अटक करावी व शेतकऱ्यांची मूळ रक्कम मिळवून द्यावे आशि तक्रार बाबाराव उईके,बेबी येलादे,गजानन वैद्य,बालू बरडे,वामन कोडापे, गजानन चंदनखेडे, किशोर क्षीरसागर,बंडू चिकराम, सतिश मंदावार ,विजय केळझरकर, व कवडू बरडे यांनी केली आहे . विशेष म्हणजे राजस्थानी व्यापारांनी वणी मारेगाव व झरी तालुक्यातील 53 लोकांची अश्याच प्रकारे फसवणूक करून 11 लाखाच्या जवळ पैसा गोळा केल्याची माहिती फसवनुक झालेले शेतकरी सांगत आहे. सदर आरोपी शोधणे मुकुटबन पोलीस समोर एक आवाहन आहे.