महाराष्ट्रराजकीय

तीन नापास विद्यार्थ्यांनी लोकशाहीचा गळा दाबला- लक्ष्मणराव ढोबळे

 

बहुजन रयत परिषदेचे नवनिर्धार संवाद अभियान यवतमाळात

यवतमाळ : वंचित बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन रयत परिषदेच्या वतीने सुरु करण्यात आलेले नवनिर्धार संवाद अभियान आज यवतमाळात पोहोचले. राज्यात होत असलेली बहुजनांची गळचेपी तसेच राज्य सरकारच्या दुर्लक्षीत धोरणाच्या विरोधात बहुजन रयत परिषदेने संताप व्यक्त केला आहे. तीन नापास विद्यार्थ्यांनी लोकशाहीचा गळा दाबला अशी खरमरीत टिका सुध्दा राज्याचे माजी मंत्री तसेच बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली आहे.

राज्यातील बहुजन वंचितांच्या समस्या एैकून घेण्यासाठी 18 जुलै रोजी बहुजन रयत परिषदेच्या वतीने नवनिर्धार संवाद अभियान सुरु करण्यात आले. आज हे अभियान यवतमाळात पोहोचले. स्थानिक विश्रामगृहावर अनेक नागरीकांच्या समस्या एैकून घेण्यात आल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. राज्यातील वसंतराव नाईक महामंडळ, अन्नाभाऊ साठे महामंडळ, रविदास महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, अन्नासाहेब पाटील महामंडळ गेल्या अडीच वर्षापासून बंद आहे. कुठलेही कर्ज वाटप न करता येथील 4 हजार कर्मचा-यांचा पगार मात्र नियमितपणे सुरु आहे. केरळ मध्ये शिक्षणावर 23 टक्के खर्च केल्या जातो, महाराष्ट्रात मात्र फक्त 6 टक्के खर्च केल्या जातो. शिक्षणासाठी ठोस निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते. मात्र महाराष्ट्रातील आघाडी सरकारकमध्ये ती दिसत नाही. ऑनलाईन च्या नादात पन्नास टकके विदयार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. देशाने स्विकारलेले नविन शिक्षण धोरण हे विदयार्थ्यांसाठी फायद्याचे ठरेल असेही ढोबळे यांनी सांगीतले. पत्रकार परीषदेला सुरेश पाटु, ईश्वर शिरसागर, दत्तात्रय पाटील, विशाल खंदारे, प्रदीप वाकपैजन, विशाल कदम, नसिम शेख, कल्पना इंगळे, संगिता शिंदे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दिशाहिन लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न – अॅड. कोमल साळुंखे

समाजातील दिशाहिन लोकांना संघटीत करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहो. गेल्या 18 वर्षापासून साळवे आयोगाच्या 82 शिफारशी धुळ घात पडल्या आहे. महिलांवरील अत्याचार तसेच जातीभेद वाढला आहे. राजकारणी मात्र यामधून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे संघर्षाशिवाय पर्याय उरला नसल्याचे अॅडव्होकेट कोमल साळुंखे यांनी सांगीतले.

 

 

 

आंदोलन करणार- रमेश गालफाडे

राज्यात वंचितांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे. उपेक्षित समाजातील अनेक जातींना तर सवलतीची सुध्दा माहिती नाही. त्यामुळे अशा उपेक्षीत जातींना वर्गवारीनुसार अ,ब,क,ड प्रवर्ग लागु करण्यासाठी संघर्ष करण्यात येत आहे. राज्यात दौरा करुन तसेच वाड्या, वस्त्यांवर जाऊन आम्ही वंचितांच्या समस्या समजून घेत आहो. 5 सप्टेंबरला या अभियानाचा मुंबई येथे समारोप होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वंचितांच्या समस्या समजवून सांगणार आहो. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास तसेच समस्या न सोडविल्यास रस्त्यावर उतरुन आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश (तात्या) गालफाडे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!