हेलिकॉप्टर ट्रायल दरम्यान पायलटचा मृत्यू, बॅगलोरला होती ऑफर

फुलसावंगी (यवतमाळ )
फुलसावंगी येथील तरुण गेल्या तीन वर्षांपासून हेलीकॅप्टर बनविण्याचे प्रयत्न करीत होता. त्याच्या मेहनतीला यश येवुन हॅलीकॅप्टर तयार झाले. स्वातंत्र दिनी १५ ऑगस्टला हेलीकॅप्टर उडविण्याचे त्याचे स्वप्न होते. काल रात्री त्याने ट्रायल घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या निर्माणधिन हेलीकॅप्टरचा मागील तुटलेला पंखा उडुन त्या तरुणाच्या डोक्याला लागला त्या मध्ये तो गंभीर जखमी झाला. त्या तरुणाला उपचारासाठी पुसद येथे नेले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी रात्री १ : ३० वाजताचे दरम्यान घडली .
शे. इस्माईल शे. इब्राहिम (२८) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. शे. ई स्माईल यांचे बस स्थानक परिसरात वेल्डीग वर्क शॉप आहे. काम करत असताना त्याच्या डोक्यात हेलीकॅप्टर बनविण्याचा प्रयत्न चालु होता. मागील ३ वर्षा पासून तो हेलीकॅप्टर बनविण्याच्या प्रयत्नात होता. अल्पशिक्षीत असल्याच्या या तरुणाचा अफलातुन प्रयोग होता. येणाऱ्या १५ ऑगस्टला त्याचा हेलीकॅप्टर त्याचा हेली कॅप्टर उडविण्याचा प्रयत्न होता. त्या हेलीकॅप्टरचे काम अंतिम टप्पात होते. त्या अनुसंघाने काल त्याने प्रथम हेलीकॅप्टर उडवून पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र येथेच नशिबाने घात केला. हेलीकॅप्टर उडविणाच्या पहिल्याच प्रयत्नात हेलीकॅप्टरचा मागील पंखा तुटून त्या युवकाच्या डोक्याला लागला. त्यामध्ये तो गंभीर जख्मी झाला. त्याला उपचारासाठी पुसद येथे नेण्यात आले परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
वेल्डीग कारागिर ते हॅलीकॅप्टर निर्मिता
फुलसावंगी येथील शे इस्माईल उर्फ मुन्ना शे.इब्राहिम(२४) याने चक्क हेलिकॉप्टर बनविले होते. तर मागील २ वर्षा पासून इस्माईल उर्फ मुन्ना ने हेलिकॉप्टर बनविण्यासाठी कष्ट घेत होता.हळूहळू त्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. मुन्ना हा वेल्डिंग काम करणारा प्रामाणिक कारागीर होता. त्याला एक भाऊ आणि एक बहीण मोठा भाऊ मुस्सवीर हा गॅस वेल्डर आहे. तर वडील घरीच असतात. इस्माईल उर्फ मुन्ना हा शे इब्राहिम यांचा द्वितीय चिरजिव आहे. गॅस वेल्डीग करता करता तो हॅलीकॅप्टर निर्मिता झाला.
१५ ऑगस्टला होते मुन्ना हैलिकॉप्टर’चे लाँचिग
घरची परिस्थिती जेमतेम. इस्माईल हा वेल्डिंग काम करणारा असल्याने तो अलमारी,कुलर असे विविध उपकरणे बनवायचा . इस्माईल हा फक्त ८ वा वर्ग शिकलेला कष्टाळू मुलगा. पण एक दिवस त्याला काय माहीत आणि कसे सुचले त्याने चक्क हेलिकॉप्टर बनवायचे ठरवले आणि त्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रवास सुरु झाला. आणि हळूहळू एक एक पार्ट स्वतः तयार करू लागला. आणि २ वर्षाच्या यशस्वी प्रयत्नानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. हेलिकॉप्टर चे नामकरणही केले “मुन्ना हेलीकॉप्टर.
१५ ऑगस्ट ला स्वातंत्र्यदिनी आपली कला जगासमोर मांडण्यासाठी त्याची जिद्द होती.त्यामुळे सध्या त्याची
रंगीत तालीम म्हणून रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टर ची ट्रायल घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरू केले इंजिन ७५० एम्पियर वर फिरत होते. सर्व व्यवस्थित सुरू होते.दरम्यान काही बिघाड झाल्याने त्याच्या लक्षात आले. हेलिकॉप्टर सुरक्षित लॅड केले.आणि मागील बाजूचा बॅलेंसिंग फॅन नादुरुस्त वाटल्याने त्याकडे लक्ष वेधले.पण अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि त्यामुळे मुख्य फॅनला येऊन धडकला आणि तो फॅन इस्माईल च्या डोक्यात लागला आणि पाहता पाहता सर्व स्वप्न भंग झाले आणि डोक्यावर फॅन लागल्याने इस्माईल चा मृत्यू झाला. त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो त्याच्या आणि त्याच्या गावाला जगात नाव करायचे पण इस्माईल चे स्वप्न अर्धवटच राहिले. फुलसावंगीच्या रँचोचा हेलिकॉप्टर ट्रायल दरम्यान मृत्यू झाला .सर्व कागदोपत्री पूर्तता करून अधिकृत हेलिकॉप्टर करण्यांचा प्रयत्नही सुरु होते हे विशेष.