क्रीडा व मनोरंजन

भरारी

 

अडवा किती वाटा आमुच्या
तुमचे लावा पणाला प्राण,
पेरा कितीही काटे तुम्ही
मार्गात होऊनी तुम्ही बेभान,
आम्ही घेऊ पुन्हा भरारी
भेदूनी उंच काळे आसमान,
जगू पुन्हा स्वच्छंद मनस्वी
आणुनी ओठावर गान ।।

थोरा-मोठ्यांची आब राखुया
मनी बाळगू सर्वार्थ सन्मान ,
जागवू मनी वाचन तृष्णा
मिळवू सर्वांसुंदर अशे ज्ञान,
नकारात्मकतेला संपवूनी निघुया
भेदूनी घनदाट अशे रान,
जगू पुन्हा स्वच्छंद मनस्वी
आणुनी ओठावर गान ।।

नको ते उसने अवसान
ना विसरू आम्ही भान,
नीतिमत्तेच्या वाटेवरती
सदैव मिळेल सन्मान,
जे मिळवू ते सात्विकतेने
संपत्ती तीच आमुची शान,
जगू पुन्हा स्वच्छंद मनस्वी
आणुनी ओठावर गान ।।

शब्दरचना
पराग पिंगळे
यवतमाळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!