महाराष्ट्र

समता सैनिक दलाच्या केंद्रीय कार्यकारणीची भेट

यवतमाळ: समता सैनिक दलाच्या केंद्रीय कार्यकारणीने यवतमाळ शाखेला भेट दिली. यावेळी विद्यार्थिनीं स्नेहा जितेंद्र अंबागडे दहावित 85% गुण व कु. दीक्षा नवीन खोब्रागडे 98:4% गुण घेऊन यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक सुनील सरीपुत्त हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय IT सेल प्रमुख किशोर चहांदे , विदर्भ संघटक नरेश ताकसांडे, प्रकाश दातार, राज्य कोअर कमिटी सदस्य, आनंद भगत विदर्भ निमंत्रक, जिल्हा संघटक चंदू मून मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्शल प्रकाश दातार यांनी केले. संचालन मार्शल विवेक कांबळे, जिल्हा प्रशिक्षक यांनी केले. तर आभार मार्शल सुनील बोरकर तालुका संघटक यवतमाळ यांनी मानले.
यावेळी मार्शल संदीप कोटंबे मार्शल अमोल भोसले, मार्शल अजय वाळके, विजय तोडेकर, बाळासाहेब देवस्थळे, विवेक वानखडे, भूपेंद्र गजभिये, राहुल वासनिक, सुरज पाटील, पद्माकर घायवान, सुनील बोरकर, चंद्रकांत सरदार, कल्पणा दातार ,शामलता तायडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!