ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात सुरु आहे महाभरती

 

यवतमाळ : अखेर बहुप्रतीक्षित असलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला ( Arogya Vibhag Bharti 2021 ) मुहूर्त मिळाला असून यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध नुकतीच करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील तब्बल 2725 जागा भरण्यात येणार आहेत.

राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी आरोग्य विभागामध्ये सुमारे 12 हजार पदांची भरती केली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र पहिल्या टप्प्यात 2725 जागांचीच जाहिरात प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. इतर जागा कधी भरण्यात येणार असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये भंडारपाल, वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक यासह विविध पदांची भरती होणार आहे. दि.6 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार असून 20 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!