ब्रेकिंग
हो सावध

सावध हो, गाफील नको
घाल माणुसकीला तू साद,
वाट पाही लपून ते
करण्यास तू काही वाद,
नजर फिरताच करेल हल्ला
कधी नको त्यांना संवाद,
संधी पाही हल्ल्याची ती
माणुसरूपी संधीसाधू औलाद ।।
शिकारी कुत्रे जसे हल्ला करे
सावज घेरुनी चौफेर ,
एक होऊनी घेई चावा
कमजोर होई शिरजोर,
थकऊनी तुला, फाडेल तुला
तुझे अपयशच त्यांचे खाद,
संधी पाही हल्ल्याची ती
माणुसरूपी संधीसाधू औलाद ।।
करतील अर्थाचा अनर्थ
सर्व प्रयत्न होतील व्यर्थ,
घालुनी वाद टोकाचा ते
स्वार्थाला करतील सार्थ,
खोटे बोलूनी करतील आभास
टाळूनी बुद्धिवादी संवाद,
संधी पाही हल्ल्याची ती
माणुसरूपी संधीसाधू औलाद ।।
शब्दरचना
पराग पिंगळे
यवतमाळ
05 ऑगस्ट 2021