महाराष्ट्र

यवतमाळात डेंग्यूचे पेशंट, नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

 

यवतमाळ :
मागील काही दिवसांपासून यवतमाळ शहरात
मलेरियासह तापाच्या पेशंटमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.  सरकारी हॉस्पिटलसह खासगी दवाखान्यांमध्येही पेशंटची गर्दी पहावयास मिळत आहे.  या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी 23 जुलै रोजी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व विरोधी गटनेते सह इतर नगरसेवकांनी यवतमाळ नगरपालिकेच्या अध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आले. आतापर्यंत जंतुनाशक फवारणी केली गेली नाही. फॉगिंग मशीन चा वापर देखील करण्यात आला नसल्यामुळे यवतमाळकरांचे आरोग्य  धोक्यात आले आहे.

शहरात  डेंग्यू व मलेरियाची साथ पसरली असून, संशयित पेशंटच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असतांना घनकचरा ठेकेदार शहरातील फक्त मुख्य असलेल्या भागातच साफसफाईची कामे करीत असून जास्त प्रमाणात असलेल्या स्लम भागात साफसफाई होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक जावेद अंसारी, विरोधी गटनेते चंद्रशेखर चौधरी, वैशाली सवाई, पल्लवी रामटेके, प्रा. बबलू देशमुख, विशाल पावडे, दर्शना इंगोले, नसीम बानो शब्बीर खान, ताहेर अली अब्दुल हबीब या नगरसेवकांनी धुरीकरण व औषध फवारणी होत नाही. नागरिक पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत आहे.  मुख्याधिकारी , नगर पालिका अध्यक्षा आणि आरोग्य सभापती यांनी विशेष लक्ष देऊन डेंग्यू आणि मलेरिया सारख्या जीवघेण्या आजारा वर रोकथाम करण्या साठी विशेष उपाय योजना त्वरित करावी.  घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या ठेकेदारावर अंकुश ठेवत साफ सफाई ची कामे व्यवस्थित करवून न घेतल्यास लोकशाही पध्द्तीने आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ नगरसेवक जावेद अंसारी यांनी दिला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!