विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात  नवीन पॉझिटिव्ह नाही

 

यवतमाळ : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर एक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 238 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणीही पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 238 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 16 व जिल्ह्याबाहेर एक अशी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72811 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71009 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 7 लक्ष 1 हजार 696 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 28 हजार 885 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.38 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2163 बेड उपलब्ध

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2163 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 7 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 780 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 752 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!