आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्काराने चित्रकार बळी खैरे सन्मानित

यवतमाळ :
स्मृतिशेष युगकवी केतन पिंपळापुरे सर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकार, प्रतिभावंत कवी बळी खैरे यांना प्रदान करण्यात आला. आंबेडकरी विचारवंत डॉ. वामन गवई यांच्या हस्ते
हा पुरस्कार देण्यात आला. समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक मार्शल सुनील सारीपुत्त हे अध्यक्षस्थानी होते.
“युगकवी केतन पिंपळापुरे स्मृती आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्कार” हा संपूर्ण भारतातील एक महत्वपूर्ण मानाचा प्रतिष्ठा असलेला पुरस्कार म्हणून मान्यता पावला आहे. हा पुरस्कार या पूर्वी प्रसिद्ध बंडखोर साहित्यिक तथा आंदोलन सेनापती राजा ढाले, संजय पवार प्रसिद्ध नाट्यलेखक, पद्मश्री लक्ष्मण माने, डॉ. कुसूम मेघवाल (राजस्थान) यांना बहाल करण्यात आला.
केतन पिंपळापुरे यांची कमतरता आंबेडकरी आंदोलनाला सदैव जाणवत राहील. यावेळी समता सैनिक दलाचे मार्शल उपस्थित होते.