क्राईम न्यूजब्रेकिंग

सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणा-या टोळीचा पर्दाफाश

 

आर्णी : सोशल मिडियाच्या माध्यमातुन अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणा-या टोळीचा पर्दाफाश केला. आर्णी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
दत्ता हिरामण राठोड ( 27) ,अर्जुन गणेश आडे (20) दोघेही रा. महादापुर ता माहूर जी. नांदेड अशी आरोपींची नावे आहे. आरोपींनी फेसबुकवर फेक प्रोफाईल तयार केले. त्या वरुन बेगलोर येथिल एका 16 वर्षीय अल्पवयिन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. चॅटिंग दरम्यान मुलीकडून अश्लील फोटो बोलाविले. त्यानंतर सदर मुलीला ब्लॅकमेल करायला सुरवात करुन लग्नास तय्यार केले. दिनांक 29 जुलै ला नागपुर ला बोलाविले. नागपुर वरुन आर्णीला घेउन आले.
शहरातिल ड्रीमलँड सिटी येथील एका 30 वर्षीय महिलेच्या घरी सदर मुलीला ठेवण्यात आले. दुस-या दिवशी आरोपींनी मुलीला घेउन माहूर येथे एका लॉज वर गेले असता लॉजवाल्याने रुम भाडयाने देण्यास नकार दिला. त्यानंतर ते परत आर्णी ला आले. त्यांच्या वर शहरातील काही युवकांना संशय आल्याने त्या युवकांनी सदर माहिती आर्णी पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपींना पोलिस स्टेशनला घेउन आले. अल्पवयीन मुलगी ही बेगलोरची असल्याने बेगलोर पोलिसांना सदर माहिती देउन त्यांना पाचारण करण्यात आले. बेगलोर पोलिस मुलीच्या नातेवाईकांसोबत आर्णी पोलिस स्टेशन गाठले असता वरील आरोपी व मुलीला आर्णी पोलिसांनी त्यांच्या ताब्यात दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!