ब्रेकिंग

रक्ताने माखले कोवळे हात; कौटुंबिक वादातून वडिलाचा खून

 

पुसद : दररोज दारु पिऊन कुटुंबातील सदस्या सोबत वाद करत असल्याने 15 वर्षिय मुलाने मारहाण करुन वडीलाचा खून केला. ही घटना काल 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी पुसद तालुक्यातील बोरी येथे घडली.
पुंजाजी हसुजी दीपके (५०) असे मृतकाचे नाव आहे. पत्नी व मुलीसोबत नेहमी वाद करीत होता. होत असे. १ ऑगस्ट रोजी रविवारी सायंकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान वाद झाला. 15 वर्षीय मुलाचा राग अनावर झाल्यामुळे वडिलाला मारहाण केली. या मारहाणीत पुंजाजी दिपके यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला व पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. खेळण्या बाळग्यासह शिक्षण घेण्याच्या वयात रक्ताने हात माखले आहे. या घटनेने बोरी येथे खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!