क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

‘शोध भाकरी’चा चित्रपट लवकरच पडद्यावर

 

शोध भाकरीचा चित्रपटाच्या पोस्टर व टिजरचे प्रकाशन

यवतमाळ :

गावोगाव भटकंती करुन आपली पारंपारिक कला दाखवुन , जीवन जगणा-या अनेक जातींपैकी एक जात म्हणजे बहुरुपी जात होय. राम, रावण , हनुमान अशा देव दानवांचे सोंगे घेवुन गावोगाव भटकंती करणारी ही जात. या अस्सल लोक कलावंतांच्या जीवनावर आधारीत ‘‘शोध भाकरीचा’’ या नावाचा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शीत होत आहे.या आगळया वेगळया चित्रपटाच्या पोस्टरचे तथा ट्रेजरचे प्रकाशन जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचे हस्ते , प्रसिध्द अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख उपस्थीतीत मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी चित्रपटाचे निर्माता तथा दिग्दर्शक आनंद कसंबे हे सुध्दा उपस्थीत होते.

*असंख्य भटक्या विमुक्तांच्या लोककलांच होणार दर्शन*

आजच्या एखाद्या तरुणाला जर , बहुरुपी म्हणजे काय ? किंवा तंटया भिल्ल म्हणजे काय ? किंवा पिंगळा, पांगुळ म्हणजे काय ? असे विचारले तर तो नकारार्थी मान हलवेल . आजच्या नवीन पिढीला या जातींची लोककला, त्यांचा जीवन संघर्ष माहित व्हावा, नेमका हाच विचार करुन आनंद कसंबे यांनी ‘‘शोध भाकरीचा’’ या चित्रपटाची निर्मीती केली आहे. तब्बल पंचविस वर्ष या लोकांच्या अनेक पालांवर जावुन ,त्यांनी अभ्यास केला आहे . सदर चित्रपट ‘बहुरुपी’ जातीवर आधारीत असुन,त्यांच्या लोप पावत असलेल्या अनेक दुर्मीळ लोककला या चित्रपटात बघायला मीळणार आहे. याचसोबत , किंगरीवर गीत गाणारे नाथजोगी , वासुदेव , पिंगळा(डमरुवाले) , पांगुळ, गोंधळी , मसाणजोगी , डोंबारी , बंजारा , धनगर, छप्परबंद, बेलदार, वडार, पाथरवट, कहार, गारुडी अशा विस ते पंचविस (ओरीजीनल)जातींची , झलक यामध्ये बघायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये भारत गणेशपुरे यांचे सह अविनाश बनसोड, प्रा. दिलीप अलोणे , नारायण चेलपेलपवार, विश्वनाथ निळे, डाॅ. ललीता घोडे, विलास पकडे, सृष्टी दुर्गे , गजानन जडेकर, गजानन वानखडे, प्रशांत गोडे, पप्पु डोंगरे , भारत लोहकरे, मनिष शिंदे , वैशाली येडे, प्रिती बावसकर, संजय माटे, राजु सुतार , मृत्युंजय डहाके, इ. कलावंतांच्या भुमिका आहेत.

 

*भटक्या विमुक्तांचा आर्त टाहो*

स्वातंत्र्यपुर्व काळात अर्थातच ब्रिटीश राजवटीत 1871 च्या जन्मजात गुन्हेगारी कायदा अस्तीत्वात होता . या कायद्यानुसार, देश स्वातंत्र होउनही समस्त भटक्यांना,गावकुसाबाहेर एखादया मैदानात पाल ठोकुन ‘‘खुल्या कारागृहातच’’ रहाव लागायच , त्या मैदानाला काटेरी तारेच चैफेर कुंपन असायच, गावप्रमुखाची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना बाहेर निघण्यास मनाई होती, कोंडवाडयात जनावर कोंडावे तस यांना कोंडलं जायच.रात्रीला तर यांना बाहेर निघायची अजिबात परवानगी नसायची. कोणी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तर गावकरी त्याला बेदम मारायचे. चित्रपटामध्ये एक कलावंत एका घरमालकाला ‘‘साहेब बक्षीस नका देवु परंतु चोर म्हणुन अपमान तरी करु नका ! मारहाण करु नका’’ ! असा आर्त टाहो फोडतो तेव्हा मन हेलावुन जाते.
तिन बांबुच्या पालावर राहुन पोटाची कसीबशी खळगी भरणा-या या उपाशी लोकांना मोर्चासाठी नेवुन राजकारण करणारेही काही कमी नाहीत.यावर चित्रपटाच्या शेवटी असलेल्या चार ओळींच गीत अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाही. ‘‘बगळयांच्या वेषात कावळे येतात, उपाशी पोटाला पुन्हा पुन्हा टोचण्या मारतात, सांगा आणखी किती पिढया बरबाद कराव्या भाकरीच्या शोधात ’’ ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!