महाराष्ट्रविदर्भ

केन्द्र सरकारने पेगासस मार्फत शेतक-यांची जासूसी करावी- सिकंदर शहा

यवतमाळ

पेगासस मार्फत लोकप्रतिनिधी, पत्रकार, मंत्री तसेच इतरांची हेरगीरी केल्यामुळे संसदेत गोंधळ सुरु आहे. या प्रकरणावरुन देशभरात केन्द्रातील भाजपा सरकार विरुध्द संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता भाजपा सरकारने देशातील शेतक-यांची पेगासस मार्फत जासूसी करावी जेणेकरुन त्यांना शेतक-यांच्या दुरावस्थेची संपुर्ण माहिती मिळेल आणि न्यायातील अडसर दूर होईल अशी टिका शेतकरी नेते तसेच शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केली आहे.

केन्द्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधीत तीन कायदे संसदेत पारीत केले. या नविन कायद्याविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हे कायदे व्यापारी धार्जीने असून त्यामुळे शेतक-यांची प्रचंड लुट होईल हे स्पष्ट असतांनाही केन्द्र सरकार कायदे परत घेण्यास तयार नाही. या कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमतीचे संरक्षण संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मुळातच सरकार व्यापारी धार्जीने असल्यामुळे ते फक्त व्यापा-यांचे हित जोपासत आहे. आज देशातील साठ टक्के पेक्षाही जास्त नागरीक ग्रामीन भागात वास्तव्यास आहे. या नागरीकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. असे असतांनाही सरकारने काळे कायदे पारीत केले. गेल्या वर्षभरापासून या कायद्याविरोधात शेतक-यांचे दिल्ली सिमेवर आंदोलन सुरु आहे. शेतकरी घरदार सोडून न्यायासाठी प्रयत्न करीत आहे. सरकार मात्र एैकायला तयार नाही. शेतीमुळे शेतक-यांची आर्थीक, सामाजिक दुरावस्था झाली आहे. बियाण्यांचे भाव गगनाला भिडले आहे. लागत मुल्यापेक्षा उत्पन्न कमी होत असल्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. आर्थीक परीस्थिती खालावल्यामुळे शेतक-यांना अनेक सामाजिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतक-यांची ही दुरावस्था केन्द्रातील भाजपा सरकारला दिसत नाही. त्यामुळे सरकारने आता पेगासस चा वापर करीत शेतक-यांची हेरगीरी करावी जेणेकरुन त्यांना शेतक-यांच्या समस्यांची तसेच त्यांच्या दुरावस्थेची खरी माहिती मिळेल आणि न्यायाचा मार्ग मोकळा होईल अशी टिका सिकंदर शहा यांनी केली आहे.

भाजपा देशातील इंग्रज

इंग्रजांनी भारतावर दिडशे वर्ष राज्य करुन नागरीकांचा छळ केला. आता भाजपाचे सरकार आपल्याच देशातील नागरीकांचा छळ करीत आहे. पेगासस मार्फत हेरगीरी करुन निवडणूकीसाठी तसेच स्वार्थासाठी त्याचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. भारतीय नागरीकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा हा प्रकार आहे. भाजपातील या इंग्रजांना आता सत्तेबाहेर घालविण्याची वेळ आल्याची टिका सुध्दा सिकंदर शहा यांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!