क्राईम न्यूजब्रेकिंग

गोळीबार करुन मोटर मॅकेनिकलची हत्या ; पुसदमध्ये भरदिवसा घडले रक्तरंजित हत्याकांड

पुसद : रस्त्यावर उभ्या असलेल्या
मोटार मॅकेनिकलवर बंदुकीतून बेशुट गोळीबार करुन त्याची हत्या केली. ही घटना पुसद शहरातील वाशिम रोडवरील हॉटेल जम-जम समोर आज रविवारी 25 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली.
इमतीयाज खान सरदार खान( 28) रा. अरुण ले आउट पुसद असे मृतकाचे नाव आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी आपल्या जवळील बंदुकीतून बेशुट गोळीबार केला. यामध्ये इम्तीयाजच्या डोक्यात गोळ्या लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. घटनास्थळावर असलेल्या लोकांनी त्याला पुसद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. वसंतनगर पोलीसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला. पुढील तपास वसंतनगर पोलीस करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!