राजकीयविदर्भ

आ. ससाणे यांच्याकडून विकास निधी देतांना दुजाभाव

 

विकास कामांच्या निधीमध्ये महागाव  तालुक्याला  ठेंगा

महागाव:
उमरखेड तालुक्याला विकास कामांमध्ये झुकते माप देवुन महागाव तालुक्याला एका दमडीचे विकास काम न देवुन आमदार नामदेव ससाणे यांच्याकडुन महागाव तालुक्याला एक प्रकारे सापत्न वागणुक दिली जात असल्याची ओरड नागरिक करीत आहेत.
उमरखेड महागाव विधानसभा निवडणुकीत आमदार नामदेव ससाणे यांना तालुक्यातील मतदारांनी जवळपास पाच हजारांचे मताधिक्य देवुन विजयाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घातली याला कारण की गेल्या अनेक वर्षांपासुन तालुक्याचा रखडलेला विकास पुर्ण करण्याचे,उद्योग धंदे उभारण्याचे आश्वासन ससाणे यांनी जनतेला मतदारांना दिले होते.त्यांच्या भुलथापांना बळी पडुन तालुक्याचा रखडलेला विकास पूर्णत्वास जावुन, उद्योग धंदे उभारून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल याच भोळ्या भाबड्या अपेक्षेने तालुक्यातील मतदारांनी त्यांना लीड देवुन विजयी केले परंतु मतदार राजाच्या या उपकारांची विकास कामे करून परतफेड करण्याऐवजी आ.ससाणे यांनी कोट्यवधींच्या विकास कामांच्या निधीमधील सर्वच निधी उमरखेड तालुक्याला वळता करून एक पैशाचाही विकास निधी न देवुन महागाव तालुक्याच्या तोंडाला पाने पुसल्याने जनतेच्या अपेक्षेवर पाणी फेरण्याचे काम ससाणे यांनी केले आहे. याअगोदर झालेल्या आमदारांनी विकास कामांच्या बाबतीत दोन्ही तालुक्यांमध्ये समतोल राखुन अनेक विकास कामे केली परंतु आमदार ससाणे यांचे गृह तालुका उमरखेड वर जास्त प्रेम असल्या कारणाने त्यांच्या कडून महागाव तालुक्याला नेहमीच सापत्न वागणुक मिळत असल्याने तालुक्यातील जनतेमध्ये त्यांच्या या दुजाभाव करण्याच्या वृत्ती बद्दल नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

शासनाकडून विकासकामांसाठी दोन कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव मागविण्यात आल्याने उमरखेड व महागाव तालुक्यासाठी प्रत्येकी १ कोटींच्या विकास कामांसाठी निधी मिळण्याचा प्रस्ताव सादर केला होता परंतु विरोधी पक्षाचा आमदार असल्याने सत्ताधाऱ्यांनी या मध्ये डावलुन केवळ उमरखेड तालुक्यासाठीच एक कोटींचा निधी मंजुर करून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी दुजाभाव करण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले.


नामदेव ससाणे(आमदार उमरखेड महागाव विधानसभा)

 

 

लोकप्रतिनिधी हा संपुर्ण जनतेचा असतो त्यामुळे कोणताही दुजाभाव न करता विकास कामांच्या बाबतीत आलेला निधी केवळ एकाच तालुक्याला न देता तो निधी लोकसंख्या,क्षेत्रफळ,निधीची आवश्यकता यांच्या आधारे दोन्ही तालुक्यांना विकास कामांसाठी विभागुन निधी दिल्यास संपुर्ण मतदार संघाचा विकास शक्य होईल.


राजेंद्र नजरधने(माजी आमदार उमरखेड-महागाव विधानसभा)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!