नाल्याच्या पुरात मजुर गेला वाहुन

निंगनूर ते चिंचवाडी रस्त्यातील नाल्याला पुर , रेस्क्यु टीमकडून शोधमोहीम
उमरखेड : तालुक्यात सतत पाउस सुरु असून, निंगनूर ते चिंचवाडी रस्त्यावरील नाल्याला पुर आला. केळी कापण्यासाठी आलेला मजुर पुरात वाहुन गेला आहे. ही घटना आज शनिवारी घडली. या घटनेची माहिती प्रशासनाला दिली. घटनास्थळी रेस्क्यु टीम दाखल झाली असून शोधमोहीम सुरु आहे.
शेख कलीम रा. औढा नागनाथ मराठवाडा ह.मु. वाई बाजार असे वाहुन गेलेल्या इसमाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून वाई बाजार येथे सासुरवाडीला तो राहत होता. निंगनूर या गावात केळी कापण्यासाठी तो आला होता. दिवसभर केली कापली व परत केळी कापणे झाल्यानंतर आपल्या गावाकडे परत जाताना निंगनूर येथील मोठ्या नाल्यांना फार मोठ्या प्रमाणात पूर आल्याने त्या पाण्याच्या प्रवाहात शेख कलीम या नावाचा व्यक्ती वाहत गेला. या रस्त्यासाठी चिंचवाडी निंगनूर येथील जनतेनी आमरण उपोषण ही केले होते.त्या उपोषणाची सांगता तत्कालीन आमदार नामदेव ससाणे यांनी केली होती. हा रस्ता तीन महिन्यात पूर्ण करून देतो असे आश्वासन ही दिले होते.परंतु त्या चिंचवाडी निंगनूर या रस्त्यावर कुठल्याही प्रकारे काम करण्यात आले नाही. पुलही झाला नाही.त्या रस्त्याअभावी व पूलाअभावी आपला प्राण गमवावा लागला.