ब्रेकिंग

पांगरा जंगलात पट्टेदार वाघाचे दर्शन

घाटंजी :-
तालुक्यातील पारवा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पांगरा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील जंगलात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहेत. पांगरा हे गाव अतिशय दुर्गम भागात असून जंगलव्याप्त भाग आहे. पारवा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या क्षेत्रात मोडल्या जाते. तर येथूनच टिपेश्वर अभयारण्य हे जवळ असल्याने नेहमी त्या ठिकाणी अस्वल व वाघाचे दर्शन होत असते. मात्र यावेळी चक्क गावाच्या बाहेर असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या लगत असलेल्या झरी या भागात वन विभागाच्या एका कर्मचाऱ्यास व इतर गावकऱ्यांना हा पट्टेदार वाघ दिसून आला असून जंगलातील झरी या भागात जवळच शेत शिवार असून गावाचे अंतर सुद्धा अतिशय जवळ असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणतीही दुर्घटना होण्याच्या आधी सदर वाघास जेरबंद करून अभयारण्यात सोडण्यात यावे अशी मागणी पांगरा व परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!