राजकीयविदर्भ

गाव तिथे शाखा आणि घर तिथे युवासैनिक अभियान राबवा – वरुण सरदेसाई

यवतमाळ :

तरुणांना युवासेनेच्या माध्यमातून समाजकारणात आणण्याचा प्रयत्न करा. शिवसेनेचे जसे शिवसंपर्क अभियान सुरु आहे त्याच पध्दतीने गावपातळीवर संवाद दौरा कार्यक्रम सुरु करा. एवढेच नव्हे तर प्रत्तेक गावापर्यन्त युवासेनेचे कार्य पोहोचविण्यासाठी गाव तिथे शाखा आणि घर तिथे युवासैनिक अभियान राबविण्याचे आदेश आज युवासेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाई यांनी युवासैनिकांना दिले. यवतमाळ येथे संवाद कार्यक्रमाच्या अनुषंगाने आले असता ते युवासैनिकांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

स्थानिक टिंबर भवनात युवासैनिकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी मंत्री शिवसेना नेते आ. संजय राठोड,युवासेनेचे अभिमन्यू खोतकर, अमेय घोले, रुपेश कदम, योगेश निमजे, आदित्य शिरोडकर, करण मडावी, युवासेना विस्तारक दिलीप घुगे, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेन्द्र गायकवाड, विश्वास नांदेकर,युवासेना जिल्हाप्रमुख विशाल गणात्रा, डॉ. प्रसन्न रंगारी, विशाल पांडे उपस्थित होते.

आढावा बैठकीला संबोधित करतांना वरुण सरदेसाई म्हणाले की कोरोना काळात युवासैनिकांनी उल्लेखनिय असे कार्य केले आहे. राज्यातील आघाडी सरकारने सुध्दा केलेल्या कार्याची प्रशंसा जगभर झाली. राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी केलेले काम बघून हजारो नागरीक आता शिवसेनेचे प्रशंसक झाले आहे. त्यामुळे जे मतदार संघ शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत त्याव्यतिरीक्त अनेक मतदार संघात सुध्दा शिवसेनेला सेवेची संधी मिळणार आहे. मात्र फक्त नेत्र‍ृत्वानेच काम करावे अशी अपेक्षा ठेवणे योग्य नसून प्रत्तेक गावापर्यन्त युवासेनेची बांधणी करण्याचा सल्ला त्यांनी युवासेनेच्या पदाधिका-यांना दिला. याप्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विशाल गणात्रा यांनी खेळाचे आयोजन, सामाजिक कार्यातील सहभाग या माध्यमातून युवकांना युवासेनेकडे आकर्षीत केले जात असल्याची माहिती दिली.
ग्रामीण भागातील युवकांना प्राधान्य देऊन युवासेनेने नियुक्ती दिल्याने त्यांचे आत्मबल वाढेल तसेच युवासेनेच्या प्रसारासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे विशाल पांडे यांनी सांगीतले. विदर्भात मिळत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद बघून “वरुण” रुपी पावसाचा वर्षाव झाल्याने विदर्भात सुध्दा युवासेनेचे भगवे पिक बहरेल असे वक्तव्य युवासेनेचे योगेश निमजे यांनी केले. युवासेनेचे कोअर कमेटी सदस्य रुपेश कदम यांनी कोरोना मुळे युवासेनेच्या विस्ताराची गती मंदावल्याची माहिती दिली. आता मात्र लवकरच मेळावे घेतले जातील. सरकारचे प्रत्तेक काम नागरीकापर्यन्त पोहचवण्याचा सल्ला त्यांनी युवासैनिकांना दिला. पक्ष वाढीसाठी बांधणी आवश्यक असल्याची आणि त्याअनुषंगाने सर्व युवासैनिकांनी कामाला लागण्याच्या सुचना आदित्य शिरोडकर यांनी दिल्या.

 

युवासैनिकांच्या पाठीशी उभा राहील

यवतमाळ जिल्हयात युवासेनेचे सामाजिक कार्यात चांगले योगदान आहे. यापुढेही कुठेही गरज पडल्यास युवासैनिकांच्या पाठीशी उभा राहील असे प्रतिपादन माजी मंत्री शिवसेना नेते संजय राठोड यांनी केले. शिवसेना हा विचार आहे. अन्यायाविरोधात लढण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली. सामाजिक बांधीलकी जपण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली. हा वसा आजही उध्दवसाहेब ठाकरे तसेच आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासह सर्व शिवसैनिक जपत आहे. बोले तैसा चाले असा नेता आम्हाला उध्दवजींच्या रुपात मिळाला आहे. त्यामुळे आपल्या नेत्रृत्वावर विश्वास ठेऊन सर्व युवासैनिकांनी ग्रामीण भागापर्यन्त युवासेना पोहचविण्याचे आवाहन सुध्दा संजय राठोड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!