ब्रेकिंग

पूस नदीमध्ये उडी मारून मुलीची आत्महत्या

 

पुसद : पुसद ते दिग्रस रोड इटावा वार्डाच्या पुलावरून एका मुलीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. घटनास्थळी मुलीची चप्पल व दुपट्टा आढळून आला. काल रात्री नऊ वाजेपर्यंत प्रशासनाने तिचा शोध घेतला परंतु तिचा मृतदेह सापडला नाही. आज उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक यवतमाळ यांना पाचारण करून मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्या मुलीचा मृतदेह पुलाच्या खाली एका कपारीत आढळून आला. जानवी संजय मगर राहणार हनुमान वार्ड असे मुलीचे नाव आहे. अद्यापही आत्महत्येचे कारण समजले नाही. आपत्ती व्यवस्थापन टीम आणि पुसद येथील गोताखोर यांनी प्रचंड मेहनत करून त्या मुलीचे मृतदेह बाहेर काढला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, उपविभागीय अधिकारी सावन कुमार, पो. निरीक्षक जेदे साहेब, पो. निरीक्षक शुक्ला साहेब, पो.नि ठाकूर साहेब तसेच नगर परिषद मुख्याधिकारी व सर्व पोलिस कर्मचारी व नगर परिषद कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!