ब्रेकिंगमहाराष्ट्र

‘निराधार महिलांना मदतीचा हाथ’

गुणवंत राठोड यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविले अनेक सेवाभावी उपक्रम

 

महागाव:
महागाव तालुक्यातील हिवरा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (ता.२२ ) विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. आज हिवरा सर्कल मध्ये निराधार महिला भगिनींना साडी,नववारी साडी, वाटप करण्यात आले,वृक्ष लागवड करण्यात आले व रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. हा उपक्रम ग्रा.प तिवरंगचे उपसरपंच युवा नेते, गुणवंत राठोड यांच्या वतीने घेण्यात आला.
पोहंडूळ येथे सोहेल चव्हाण यांनी कार्यक्रम आयोजित केले. तिवरंग येथील कर्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमराजी जाधव,धर्मा कावरा जाधव, शिवा गोगा जाधव, रामजी राठोड, दत्ता आडे, नामदेव फकिरा जाधव, विलास जाधव, बाळू मदने ग्रा. प .सदस्य, सुनील राठोड, इरफान चव्हाण ग्रा प सदस्य,आजू आडे ग्रा प सदस्य,संजय नान्नोर ग्रा प सदस्य,शे अल्ली,निशांत जाधव,अल्केश चव्हाण,सुनिल तायडे ग्रा प सदस्य,भोला कांबळे,राजू खरे,सलीम साखळे,संतोष कांबळे,गजानन सावळे,बाळू हरीचंद जाधव,विष्णू जोगदंडे,शेख छनू व गावातील सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

गुणवंत राठोड हे नागरिकांच्या मनातील नांव
विद्यार्थी दशकापासून गरिबीतून उभारणीस आलेलं नेतृत्व. नेतृत्वाच्या बळावर तालुक्यातील ग्रामस्थांच्या मनात त्यांनी आपली छाप कोरली आहे. कर्तुत्ववाने गुणवंत राठोड यांनी आपले ब्रॅण्ड नाव निर्माण केलेले आहे. रंजल्या गांजल्यापासून सर्वांना विकासासोबत घेवून जाणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची तिवरंगमध्ये ओळखले जातात. ते स्वेच्छेने समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असल्याची प्रतिक्रीया यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!