
वर्धा : जिल्ह्यातील तास येथील शेतकरी शेतातून परत येत असताना गावाजवळ असलेल्या नाल्याला पूरात बैलबंडीसह शेतकरी वाहुन गेला. संतोष पंढरी शंभरकर असे शेतक-याचे नाव आहे. अजुन पर्यंत दोघांचाही शोध लागला नसून तहसीलदार राजू रणवीर ,नायब तहसीलदार के डी किरसान, समुद्रपूर येथील ठाणेदार हेमंत चांदेवार, धर्मेंद्र तोमर शोध घेत आहे.
समुद्रपूर तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात नाल्याला पूर आला. समुद्रपूर येथील महीला शेतातील कामे करून परत येत असताना वाघाडी नाल्यावरील पुलावरून येत असताना पाय घसरल्याने रंभाबाई नामदेव मेश्राम(वय ७०) ती महिला वाहून गेली. तर दुस-या घटनेत तालुक्यातील तास येथील शेतकरी शेतातून परत येत असताना गावाजवळ असलेल्या नाल्याला पूरात बैलबंडीसह शेतकरी वाहुन गेला. संतोष पंढरी शंभरकर असे शेतक-याचे नाव आहे. अजुन पर्यंत दोघांचाही शोध लागला नसून तहसीलदार राजू रणवीर ,नायब तहसीलदार के डी किरसान, समुद्रपूर येथील ठाणेदार हेमंत चांदेवार, धर्मेंद्र तोमर शोध घेत आहे.