ब्रेकिंगविदर्भ

वर्धा जिल्ह्यातील आठ गावांना सतर्कतेचा इशारा

 

वर्धा : राज्यात पावसाने थैमान घातले असून, हवामान विभागाकडून पुढील 5 दिवस सतर्कतेचा इशारा दिला आहे. वर्धा जिल्ह्यात आठ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जिल्ह्यातील धरणाचे पातळी गाठली नसली तरी पावसाच्या अंदाजानुसार समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथील लालनाला धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. सध्या या दरवाज्यातून 37.47 क्युमेंक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील डोंगरगाव , असोला , नाराणयपूर , चिखल कोरा , मंगरुळ , सिल्ली , दरोडा आदी आठ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता वर्मा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!