ब्रेकिंग

लग्णाचे आमिष : अल्पवयीन मुलीला पळविले

झरी : बाजार करण्यासाठी मुकुटबन येथे आलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने पळवून नेले. ही घटना 19 जुलै रोजी घडली. आरोपीला अल्पवयीन मुलीसह बोरी (पाटण) गावातून ताब्यात घेण्यात आले आहे.
आई-वडिलांचे काही वर्षापुर्वी लग्न झाल्याने १७ वर्षीय मुलगी काकासह राहते. सोमवारी 19 जुलै रोजी अल्पवयीन मुलगी ही तिच्या वहिनीसोबत बाजार करण्यासाठी तिच्या गावाहून मुकुटबन येथे गेली होती. बाजार केल्यावर त्या दोघीही गावाला परत जाण्यासाठी एका ऑटोत बसल्या. मुलीने तिच्या वहिनीला दोन मिनिटात येते असे सांगितले व ती ऑटोतून खाली उतरली. मात्र बराच वेळ होवन मुलगी काही परत आली नाही. त्यामुळे मुलीच्या वहिनीने परिसरात शोधाशोध केली. मात्र ती आढळून आली नाही. पाटण येथील विकास विलास रासमवार (25) याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे कळले. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेल्याचा संशय आला. त्यावरून त्यांनी मुकुटबन पोलीस स्टेशन गाठले व आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. मुकुटबन पोलिसांनी बोरी येथून आरोपीला अल्पवयीन मुलीसह त्याला ताब्यात घेतले. सध्या आरोपीची यवतमाळ येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनात विजय वानखेडे, संतोष कायपेल्लीवार, परेश मानकर करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!