ब्रेकिंग

पावसाचा कहर : ४० गावांचा संपर्क तुटला 

 

नदी व नाले तुडुंब, पुरात वाहुन गेलेल्या युवकाला वाचविण्यात यश 

यवतमाळ : जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, नदी, नाल्यांना पुर आला आहे. महागाव व उमरखेड तालुक्यातील चांगलाच फटका बसला असून, पैनगंगा अभयारण्य परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटला आहे. नाल्याला आलेल्या पुरातून वाहुन गेलेल्या युवकाला वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन उमरखेडचे तहसीलदार आनंद देउळगावकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील उमरखेड, महागाव व अन्य तालुक्यात जोरदार पाउस झाला. या पावसामुळे नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. उमरखेड तालुक्यातील ढाणकी, गांजेगाव, कुपटी, बिटरगाव, दहागाव यासह अनेक ठिकाणी नदी, नाल्याना पुर आला आहे. यामुळे या भागातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. दहागाव जवळील नाल्याच्या पुरात कुपटी येथील विजय दत्ता इलतकर हा युवक वाहुन गेला होता. यावेळी प्रसंगावधान राखुन सदर युवकाने एका झाडाला पकडले. या घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी व गावातील नागरिकांनी प्रयत्न करुन विजय इलतकर याना पुरातून बाहेर काढले. त्यामुळे विजय इलतकर यांचा जिव वाचला. पुरामुळे ४० गावांचा संपर्क तुटला असुन, उमरखेड, पुसद, ढाणकी, हिमायतनगर व अन्य भागातील वाहतुक ठप्प झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!